आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गर्लफ्रेंड'विषयी बोलला टायगर, 'मी तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु...'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्यूझिक व्हिडिओ 'बेफिक्रा'च्या लाँचिंगदरम्यान दिशा आणि टायगर - Divya Marathi
म्यूझिक व्हिडिओ 'बेफिक्रा'च्या लाँचिंगदरम्यान दिशा आणि टायगर
मुंबई: टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटाणी अनेकदा डिनर डेटवर दिसले आहेत. मात्र तरीदेखील दोघांनी कधीच त्यांच्या नात्याच्या खुलासा केला नव्हता. अलीकडेच टायगर आणि दिशाचा पहिला म्यूझिक व्हिडिओ 'बेफिक्रा' रिलीज करण्यात आला. यात टायगर आणि दिशा दोघेही उत्कृष्ट डान्सर असल्याचे दिसून येत आहे. या गाण्यात दोघांची शानदार केमिस्ट्री दिसतेय. गाण्यात दोगे 4-5 वेळा लिप-लॉक करतानासुध्दा दिसत आहेत.
जाणून घ्या दिशाविषयी काय म्हणाला टायगर...
म्यूझिक व्हिडिओ 'बेफिक्रा'च्या लाँचिंगवेळी टायगर आणि दिशाला लव्ह-अफेअरविषयी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, 'मी दिशावर खूप प्रेम करतो, परंतु फक्त एक मित्र म्हणून. आम्ही दोघे केवळ मित्र आहोत. एकमेकांसोबत अनेक वर्षांपासून चांगली बाँडिंग शेअर करत आहोत. आम्ही सोबत डान्स करतो. जिममध्येसुध्दा जातो. कधी-कधी एकत्र डिनरलासुध्दा जातो.'
एकमेकांसोबत कम्फर्ट राहतो...
दिशा म्हणाली, 'आम्ही एकमेकांसोबत कम्फर्ट झोनमध्ये राहतो. आम्ही सोबत असल्यावर अगदी लहान मुलांसारखे राहतो. सोबत फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतो. आम्ही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतो.'
जेव्हा दिशाला सोडून निघून गेला होता टायगर...
अलीकडेच, टायगर आणि दिशा वांद्रा स्थित एका रेस्तरॉमध्ये डिनरसाठी गेले होते. तिथून बाहेर पडताना मीडियाच्या कॅमे-यांनी त्यांना घेरले. त्यानंतर टायगरने दिशाला तिथेच सोडले आणि कारमध्ये बसून निघून गेला. नंतर दिशा ऑटोरिक्षाने घरी गेली होती.
'एम एस धोनी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय दिशा...
दिशा दिग्दर्शक नीरज पांडेच्या 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिने मागील महिन्यात जॅकी चैनसोबत 'कुंग फू योगा'चे शूटिंग केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बेफिक्रा'च्या लाँचिंगदरम्यानचे दिशा आणि टायगरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...