आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Epic Moment: दीपिका पदुकोणच्या एक्स-बॉयफ्रेंडला या अंदाजात भेटला रणवीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह आणि रणबीर कपूर)
मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोणचा सध्याचा बॉयफ्रेंड रणवीर सिंह आणि एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर शनिवारी रात्री एकत्र पार्टी एन्जॉय करताना दिसले. निमित्त होते अभिनेता अर्जुन कपूरच्या 30 व्या वाढदिवसाचे. अर्जुनच्या बर्थडे पार्टीत बी टाऊनमधील बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. मात्र पार्टीत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले रणवीर सिंह आणि रणबीर कपूर. रणबीर कपूर येथे त्याची सध्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत पोहोचला होता. पार्टी संपल्यानंतर रणवीर सिंह या कपलला सीऑफ करायला पोहोचला होता. येथे त्याने रणबीर आणि कतरिनाची गळाभेट घेऊन बाय केले.
अर्जुन कपूरच्या बर्थडे बॅशमध्ये सोनम कपूर, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, रिया कपूर, अंशुला कपूरसह बरेच सेलेब्स पोहोचले होते. या सर्वांनी ही पार्टी खूप एन्जॉय केली. पार्टीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्जुन कपूरच्या बर्थ डे बॅशचे Inside Photos...