आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Witty Side Of Dimple Kapadia At Daughters Book \'Mrs Funnybones\' Launch

लाँचिंग इव्हेंटमध्ये अक्षयने सासूचे तोंड केले बंद, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, आमिर खान आणि टि्ंवकल खन्ना)
मुंबई- अभिनेत्री टि्ंवकल खन्नाने आपले पहिले पुस्तक 'मिसेज फनीबोन्स' जुहू स्थित हॉटेल डब्ल्यू मॅरियटमध्ये लाँच करण्यात आले. यावेळ आमिर खान, निर्माता करन जोहर, टि्ंवकलचा पती अक्षय कुमार आणि आई डिंपल कपाडियासुध्दा उपस्थित होते.
अक्षयने सासूचे तोंड केले बंद-
टि्ंवकल खन्नाचे हे पुस्तक अनेक गंमतीशीर किस्स्यांनी भरलेले आहे, परंतु हे पुस्तक लाँच करतानासुध्दा एक रंजक किस्सा घडला. झाले असे, की डिंपल कपाडिया स्टेजवर आल्या आणि त्यांनी अक्षय-टि्ंवकल यांचे किस्से ऐकवण्यास सुरुवात केली. डिंपल यांनी सांगितले, की दोघांने लग्न झाल्यानंतर एकेदिवशी मी त्यांच्या घरी गेले. तिघांनी सोबत खिचडी खाल्ली. खाल्ल्यानंतर अक्षयने सोडा मागितला. ते पाहून टि्ंवकल गुनगुनायला लागली, 'जब पेट बिघड जाये, अक्षय थोडा पाइये. हवा इधर से, हवा उधर से, कहे घबराये...' डिंपल यांनी गाऊन आणि डान्स करून टि्ंवकल आणि अक्षयचा हा किस्सा ऐकवला. हे पाहून उपस्थित सर्वांना हसू आले. इतकेच नाही तर अक्षय सासू डिंपलचे तोंड बंद करताना दिसला.
अभिनेत्रीपासून लेखिका झालेली टि्ंवकल खन्नाच्या या नवीन उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते. यावेळी, हृतिक रोशनची पूर्वाश्रमी पत्नी सुझान खान, जया बच्चन, सोनाली बेंद्रे, गायत्री, अबु जानी, संदीप खोसला, रिंकी खन्नासह अनेक स्टार्स स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS..