Home | Feature | 2 Women Centric Movies On International Women's Day

महिला दिन आणि प्रदर्शित झालेले दोन स्त्रीप्रधान चित्रपट

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 10, 2014, 12:26 PM IST

शनिवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आणि शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांपैकी दोन चित्रपट स्त्रीप्रधान आहेत. ‘क्वीन’ची नायिका मध्यम वर्गातील असून साधारणपणे थोडीशी शिकलेली आहे. एका दीर्घ विदेशवारीत ती स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ‘गुलाब गँग’ची नायिका रज्जू लहानपणापासूनच शिकण्याच्या इच्छेवरून आपल्या सावत्र आईचा मार खात आली आहे. तिने आयुष्याच्या शाळेत स्वावलंबनाचे धडे घेतले आहेत. योगायोगाने हाच धडा ‘क्वीन’ची नायिकादेखील घेते. रज्जू असा निष्कर्ष काढते की, अन्यायाधारित असमानतेने पीडित असलेल्या आजारी समाजात अधिकार हिसकावून घ्यावा लागतो आणि घुंगरू, पैंजण घालण्याऐवजी तलवार उचलावी लागते. ती हिंसेला न्यायसंगत मानत नाही; परंतु लाख विनंत्या केल्यावरही काहीच होत नसेल, तर शस्त्र उचलते. ती आपल्यासारख्याच पीडित महिलांना एकत्रित करून संघटना तयार करते. गावात शाळेची स्थापना करणे, हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न आहे.

  • 2 Women Centric Movies On International Women's Day

    गुलाब गँग या चित्रपटात शहरातील शिकलेल्या व उच्च वर्गातील एका राजकीय कुटुंबातील महत्त्वाकांक्षी व निर्भय महिला दाखवण्यात आली. तिने आपल्या नेता असलेल्या पतीची हत्या करून त्याची राजकीय वारसदार म्हणून आपला हक्क मिळवला. एका दलित महिलेला असे वाटते की, शाळेची स्थापना करणे हाच उपाय आहे. मात्र, शिकलेली मॅडम साम, दाम आणि दंडाच्या धोरणाचा अवलंब करत सत्तेच्या माध्यमातून आपले लालची रूप दाखवते. कदाचित अशाच एखाद्या संदर्भात निदा फाजली यांनी, ‘या निरागस मुलांना वजनदार पुस्तकांपासून दूर ठेवा. दोनेक पुस्तके वाचून ही मुले आपल्यासारखीच नीच होतील,’ अशा आशयाच्या ओळी लिहिल्या होत्या. शिक्षणासाठी असलेली तळमळ प्रशंसनीय आहे, परंतु ज्या शिक्षणासाठी आवाज उठवला जात आहे, गोंधळ होत आहे, त्या शिक्षणाचे स्वरूप काय आहे? हे शिक्षण नैतिक मूल्ये शिकवते का? किंवा केवळ अंकगणित व अक्षरज्ञान देऊन तुमच्या विचारांवर फक्त एक मुलामा चढवते? भारतात भरपूर शैक्षणिक संस्था आहेत, परंतु त्या काय शिकवत आहेत? नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात जगातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये भारतात भव्य संख्येने उघडलेल्या संस्थांपैकी केवळ तीन संस्थांनाच महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे.
    ‘गुलाब गँग’मध्ये अशिक्षित, पण प्रामाणिक असलेली रज्जू (माधुरी) शिकलेल्या, उच्चवर्गीय, अनुभवी मॅडमशी (जुही चावला मेहता) लढा देते. हे द्वंद्व अत्यंत रंजक आहे. दिग्दर्शक सौमिक सेन यांनी कथा-पटकथा आणि गीतेही लिहिली आहेत. तसेच त्यांना चालीही लावल्या आहेत. त्यांनी लोकगीतांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे. रज्जोच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका आणि अभिनय कमालीचा आहे. तिचा मृत्यूही हृदयद्रावक आहे. या चित्रपटात दोन्ही महिला पात्रांमध्ये होणारे संवाद जणू सलमान खानशाहरुख खान ‘वन अप मॅन शिपचा खेळ खेळत आहेत’ अशा प्रकारचे आहेत. जर रज्जूकडे शब्दांचे तीर आहेत, तर मॅडमचे हास्य त्यातील दंश काढून टाकते. दिग्दर्शकाने रज्जूला जास्त महत्त्व दिले आहे. मात्र, मॅडमचे पात्रही भक्कम आहे. कारण पहिल्यांदाच एखादी स्वार्थी महिला ओरडत नाही. ती फक्त हसते आणि त्यात हजार शब्द लपलेले असतात. अत्याधुनिकतेसह वाईट काम करणे अदाकारीचा एक नवा अंदाज असून त्याचे श्रेय दिग्दर्शक आणि जुही दोघांनाही जाते. या चित्रपटातील सर्वच कलावंतांनी परिपक्व अभिनय केला आहे आणि भूमिकासुद्धा सुस्पष्ट परिभाषित आहेत. दिग्दर्शकासमोर कोणतेच धुके नाहीत. सर्व काही स्पष्ट आहे. रज्जो आणि सहकार्‍यांचे संवाद गावठी असून त्यात कोणताच बनावटपणा नाही. मॅडम जणू काही निरागसपणे केक कापत असल्यासारख्या हत्या करतात.
    दरवर्षी महिलादिनी लेख लिहिले जातात. स्त्रीप्रधान चित्रपटही प्रदर्शित होतात. मात्र, यथार्थाच्या जमिनीवर काहीच बदल होत नाहीत. सात मार्चपूर्वी आणि नऊ मार्चनंतर रज्जो नेहमीच मार खात असते. तिच्या वाचाळ मैत्रिणीचा प्रेमाद्वारे छळ होतो आणि हत्या केली जाते. एका व्यसनी युवकाला दंड करण्यासाठी त्याचा एक अवयव कापला जातो; परंतु त्या अवयवाची संपूर्ण ताकद अडाणी मेंदूत आहे. हा मेंदू नदीकाठावरील एक दगड असून त्यावर अनेक शतकांपासून परिवर्तनाच्या लाटा आपले कपाळ फोडत आल्या आहेत, तरीही तुटला नाही, पण गुळगुळीत झाला आहे. समाजाच्या याच गुळगुळीतपणावर ‘गुलाब गँग’ प्रहार करतो. शुक्रवारी प्रदर्शित झालेले ‘क्वीन’ आणि ‘गुलाब गँग’ पाहणार्‍या प्रेक्षकांमध्ये पुरुषच जास्त होते. हेच तर संपूर्ण स्त्री केंद्रित प्रयत्नांचे कटू सत्य आहे.

Trending