आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- सिंगर संकेत बँकर यांचे ‘तू कहे” हे गीत यूट्यूबवर नुकतेच रिलीज झाले आहे. या गीताला आतापर्यंत 3 लाखांहून जास्त (3.30 लाख) व्ह्यूज मिळालेले आहेत. हे गीत नि:स्वार्थ आणि कोणत्याही अटी-शर्ती नसलेल्या प्रेमभावनेला व्यक्त करणारे आहे. या गीतात आपल्या प्रेमासाठी "हे सर्व माझ्याबाबत नाही, तर तुझ्याबद्दलच आहे" अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे.
> या सुंदर गीतात प्रेमाच्या विविध पैलूंना-रूपांना चित्रित करण्यात आले आहे, मग ते आईवडील आणि मुलांमधील प्रेम असो, प्रेमीयुगुलांमधील असो, पती-पत्नीतील प्रेम असो किंवा वाटेने सोबत जाणाऱ्या दोन मित्रांमधील प्रेम असो.
> संकेत म्हणतात की, आजकाल प्रेमभावना ही चित्रपटांत किंवा म्युझिक व्हिडिओत नेहमी पुरुष आणि महिलेदरम्यानच दर्शविली जाते, परंतु प्रेमाचा परीघ त्यापेक्षा जास्त विस्तृत आणि गहिरा आहे. जसे या गीताचे बोल आहेत,‘उसने तुझे रचा है, उसी का नूर सादा है, प्यार है तेरा लबों पे, तू कहे...’, याचप्रकारे प्रेम ही भावना आपल्या नैसर्गिक रूपात परमात्मा आणि नि:स्वार्थ प्रेमाचेच प्रतिबिंब आहे, पूर्णपणे शुद्ध आणि कोणत्याही अटीविरहित...
> जितेंद्र जैस्वार यांनी लिहिलेले आणि बेनो यांनी संगीत हे गीत संकेत यांचे यूट्यूबवर पहिले सादरीकरण आहे. या गीताने इंटरनेटवर धूम केली असून असंख्य रसिकांनी या गीतावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
व्यवसायाने बँकर आहेत संकेत..
आपल्या नावानुसारच संकेत व्यवसायाने एका बँकेत काम करतात. ते उत्साही आणि प्रतिभावान गायक आहेत. किशोर कुमार आणि आर. डी. बर्मन यांचे प्रशंसक आणि अनुयायी असलेले संकेत यांनी प्रसिद्ध शंकर महादेवन अकॅडमीमधून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. आपले आराध्य गायक किशोरदा यांच्या पावलावर पाऊल टाकत संकेत यांनी योडलिंगमध्येही नैपुण्य प्राप्त केले आहे. जे या गीतातही सुंदर चित्रित करण्यात आले आहे.
गाण्यात सुमधुर प्रेमाची भावना...
या मधुर गीतात प्रेमाच्या भावनेला कोणत्याही अलंकारांशिवाय दर्शवण्यात आले आहे. संकेत म्हणतात की, “या गीताचा भाव मला सरल आणि तरीही प्रभावी ठेवायचा आहे.” तर मग चला, या व्हॅलेंटाइन दिनी या सुमधुर गीताने - "तू कहे..' सोबत आपल्या प्रेमाला अभिव्यक्त करा...
पुढच्या स्लाइडवर पाहा, अटीविरहित प्रेमभावनेला दर्शवणारे यूट्यूबवरील 'तू कहे' हे गीत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.