आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Film Distributor Of Punjab Who Showed Faith On Bobby Of RK Films

जाणून घ्या, एका दिवंगत चित्रपट वितरकाशी निगडीत असलेली आतील गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चित्रपट शतकाच्या महोत्सवात कलावंत, संगीतकार आणि दिग्दर्शक यांच्याविषयी खूप लिहिले जात आहे. मात्र असे अनेक लोक आहेत जी माध्यमापासून दूर आहेत. सगळ्यात कमी प्रचार प्रदर्शक आणि वितरकांचा होत असतो. तथापि चित्रपटाच्या यश आणि अपयशाचा सर्वाधिक प्रभाव याच वर्गावर होतो. संपूर्ण भारतात असंख्य एकल थिएटर बंद झाले आहेत. चित्रपट उद्योगात नुकसान झालेले वितरक मोजणे अशक्य आहे.

या शतकात प्रदर्शक आणि वितरकांच्या पैशाने सिनेमाचे पोषण होत आले आहे. खूप काळापर्यंत ठरलेल्या किमतीचा पन्नास टक्के पैसा शूटिंगच्या वेळी वितरक निर्मात्यांना पाठवत होते. त्यामुळे निर्मात्याचे चित्रपट निर्मितीचे आर्थिक ओझे थोडे कमी व्हायचे. प्रदर्शन आणि वितरण क्षेत्रातून चित्रपटाचा खर्च निघतो. चित्रपटाच्या अपयशाचे खापर वितरक आणि प्रदर्शकाच्या डोक्यावर फोडले जाते.

जालंधरमध्ये 29 जूनला वितरक वकील सिंहाचा अपघाती मृत्यू झाला. पाच दशकांपर्यंत वितरक सरदार वकील सिंह जालंधरच्या चित्रपट मंडीत न्यायमूर्तीप्रमाणे राहिले. त्यांच्या कार्यालयात शुक्रवार दुपारपासूनच चित्रपटाची शस्त्रक्रिया सुरू होत होती. इतक्या वर्षांपर्यंत 10-15 माणसांचे दुपारचे जेवण ते आपल्या घरून आणत होते. त्यांचे कार्यालय फिल्मी लंगर होत होते. वकील सिंह दुपारी कारने यायचे. मात्र संध्याकाळी पायीच घरी जायचे. सकाळी आठ-दहा किलोमीटर फिरणे त्यांनी कधीच सोडले नाही. मुंबईला आल्यावरसुद्धा ते सकाळीच फिरायला जात होते. परत येताना भरपूर फळ विकत घेऊन यायचे आणि दहा-बारा ग्लास लस्सीची ऑर्डर देऊन यायचे. बांद्रामधील लिंक-वे हॉटेल सगळ्या वितरकांचे प्रिय हॉटेल होते. तो व्यक्ती कधीच काही एकटा खात नव्हता, जणू काही चालता-फिरता माणसाच्या रूपात मूर्त एक लंगर होता.

पुढे वाचा, वकील सिंह यांनी लाऊड स्पीकरवर केला होता चित्रपटांचा प्रचार...