आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या चाळिशी उलटलेल्या नट्यांच्या पुनरागमनाविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन तिचे आवडते दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटातून पुनरागमन करत आहे. तिने मणिरत्नमच्याच ‘इरुवर’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. शिवाय त्यांच्या ‘गुरू’ आणि ‘रावण’ चित्रपटातदेखील तिने काम केले आहे. संजय लीला भन्साळीदेखील तिचे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत तिने ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ चित्रपट केले आहेत. मणिरत्नम यांचे तामीळमधील गेले काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे हा चित्रपट मणिरत्नम आणि ऐश्वर्या दोघांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. ऐश्वर्याचा पहिला हिंदी चित्रपट राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र, संजय लीला भन्साळीच्या सलमान खान अभिनीत चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली.
चाळिशी ओलांडलेल्या अभिनेत्रींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...