सध्या मुंबईचे कलावंत कास्ट्यूम डिझायनरसोबत आपला बराच वेळ घालवत आहेत. इतका वेळ तर ते चित्रपटाच्या पोशाखांसाठीदेखील देत नसतील. ताजी बातमी आहे की, यशस्वी दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी लवकरच लग्न करणार आहेत. लग्नाची तारीख व्हॅलेंटाइन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी असल्याची चर्चा आहे. लग्न जेसलमेरमध्ये होऊ शकते.
जॉन अब्राहमने नाताळाला न्यूयॉर्कमध्ये लग्न केले होते. आजकाल बरेच श्रीमंत लोकदेखील परदेशात जाऊन लग्न करतात. त्यामुळे भारतीय बाजाराला त्याचा फायदा होत नाही.