आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Abhishek Are Repeating Story Of Film Abhiman

ऐश्वर्या-अभिषेकमध्ये ‘अभिमान’ची पुनरावृत्ती ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जेव्हा चोरी आणि शिरजोरीचा काळ चालत आहे आणि कधी ‘कूल’ म्हटल्यावर मिजास दाखवणारे तथा विजयावर म्हशीचा बळी देण्यासारख्या रूढी-परंपरांवर विश्वास ठेवणारे गप्प राहण्यात धन्यता मानायला लागले तेव्हा गांभीर्य किंवा खोलवर जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटते. तसेच काही अफवा आणि गॉसिपवर विश्वास ठेवण्याची इच्छा होते. जर कलकलाटात पेंगणे शक्य नसेल तरीसुद्धा एखादी डुलकी चोरली जाऊ शकते. असो, कान्स चित्रपट महोत्सवाला अनेक भारतीय लोक उपस्थिती लावतात. कारण आपल्या घरात या महोत्सवाचा गर्वाने प्रचार केला जाऊ शकतो. फक्त भारतातच निमंत्रणांचा जुगाड केला जाऊ शकतो, असे म्हणणे व्यर्थ आहे. जुगाड करणारे संपूर्ण जगात आहेत. कदाचित तेसुद्धा कालातीतही आहेत. मल्लिका शेरावत आता मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर दिसून येत नाही, परंतु कान्स चित्रपट महोत्सवात कशी काय दिसून येते? गावातील जत्रेत कार्डबोर्डच्या कारजवळ उभे राहून फोटो काढून घेतले जात होते आणि ते एकत्र कुटुंबाच्या प्लास्टर निघालेल्या भिंतीवर अडकवले जात होते. आजकाल क्वचितच कर्डबोर्डच्या कारच्या जागी तंत्रज्ञान कान्सचा भ्रम तयार करू शकते.

यंदा कान्समध्ये आयोजकांकडून अधिकृत निमंत्रण मिळाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन तेथे गेली होती. ‘सासू-सासर्‍यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अभिमान’च्या कथेप्रमाणेच तुझ्या आयुष्यात काही घडत आहे का? कारण तुझा ठिकठिकाणी सन्मान होत आहे आणि पती अभिषेक त्या मोठेपणाच्या छायेतच राहत आहे.’, अशी टीका तेथे एका पत्रकाराने केली होती. ऋषिकेश मुखर्जींच्या सातव्या दशकातील 'अभिमान'मध्ये शहरी रॉकस्टार अमिताभ गावंढळ मुलगी जयाशी लग्न करून तिला घरी घेऊन येतो. त्यानंतर काही वेळातच जया लोकप्रिय गायिका बनते आणि रॉकस्टारची लोकप्रियता संपुष्टात येते. त्याचे नैराश्य त्याच्या वैवाहिक आयुष्यात कडवटपणा भरतो. पतीचा अहंकार सापाप्रमाणे फणा काढतो. अखेर प्रेम अहंकारावर भारी पडते.