आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Kapoor's 24 Parde Ke Peeche By Jay Prakash Chouksey

अनिल कपूरची रोमांचक मालिका '24', क्राईम-थ्रिलरबरोबरच अ‍ॅक्शनचा तडका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूरच्या वेळेच्या आराखड्यानुसार बनवण्यात आलेल्या मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आहेत. अमेरिकेच्या टेलिव्हिजनवर मैलाचा दगड ठरणार्‍या ‘24’ नावाच्या मालिकेचे अनिलने अधिकार विकत घेतले आहेत. शिवाय मूळ तंत्रज्ञांच्या देखरेखीतच ही मालिका बनवण्यात आली आहे. मूळ कथा तशीच ठेवत फक्त पात्र आणि परिसराचे भारतीयकरण करण्यात आले आहे. या राजकीय थरार नाट्यात केंद्रीय भूमिका युवा पंतप्रधानाची आहे. त्याचे कुटुंब दशकांपासून राजकारणात आहे. पूर्ण होऊ शकणारे आश्वासनच जनतेला द्यावेत या अनुभवी आईच्या विचारांशी तो तरुण सहमत नाही. त्याचे मत आहे की, कोते राजकारण सोडून उच्च आदर्शानुसार राज्य करायला हवे. याच कुटुंबातील जावई दारुडा आणि चरित्रहीन असतो. या सगळ्या काल्पनिक पात्रांमध्ये वास्तवात असलेल्या काही लोकांच्या प्रतिमा शोधल्या जाऊ शकतात. खरं तर हा इतिहासही नाही आणि वर्तमानातील सरकारी गॅजेटही नाही. ही सेल्युलाइडची काल्पनिक कथा आहे.