आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अद्याप \'... रामलीला\'च्या नशेत धुंद आहे रणवीर, भन्साळी कसा बनवतील \'बाजीराव मस्तानी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्साळी मागील दशकापासून ‘बाजीराव मस्तानी’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वप्रथम सलमान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन बनवणार होते. नंतर सलमान व करीनासोबत प्रयत्न केले. एकेकाळी अजय देवगण आणि करीना कपूरसोबत करण्याचा विचार केला. आता या प्रोजेक्टच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत आला आहे. आता ते रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण किंवा अजय देवगण व दीपिकाला घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत.
रणवीर सिंहचा ‘..रामलीला’ची नशा अद्याप उतरलेली नाही. त्यामुळे त्याचा हा उतावळेपणा महान योद्धा बाजीरावला कसा न्याय देईल?
अजय देवगण कोणतीही भूमिका करू शकतो. दीपिकादेखील मस्तानीला न्याय देऊ शकेल. मात्र, स्वत: भन्साळी या महान विषयाला न्याय देतील का? ‘हम दिल दे चुके सनम’नंतरचे भन्साळी या महान प्रेमकथेला न्याय देऊ शकले असते, परंतु ‘राऊडी राठोड’चा निर्माता आणि ‘गोलियों कि रासलीला..’चा दिग्दर्शक या ट्रॅजिक प्रेमकथेला कसा काय न्याय देऊ शकतील? आजच्या काळात ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तयार करण्यात येणार्‍या चित्रपटाचे बजेट खूप मोठे असते. त्यामुळे याचे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी अनेक सिनेतारे चित्रपटात असणे गरजेचे आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या काय आहे या प्रकरणातील पेच आणि का या सिनेमाविषयी संजय लीला भन्साळी यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत...