आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खानने आत्महत्या का केली?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवीस वर्षीय जिया खानची आत्महत्या दु:खद आहे. तिने अभिनय केलेले ‘नि:शब्द’, ‘गझनी’ आणि ‘हाऊसफुल’ बजेटच्या दृष्टीने यशस्वी चित्रपट आहेत. मात्र, तिला जास्त संधी मिळाली नाही, कारण चित्रपट उद्योगात मिळून-मिसळून राहावे लागते, चापलुसीदेखील करावी लागते. एखाद्या मोठय़ा कलाकाराने कामाची शिफारस केली तर चित्रपट मिळू लागतात. तिने अमेरिकेत शिक्षण घेताना तेथील स्वातंत्रता पाहिली होती. तेथील वातावरण अंतराळाप्रमाणे असते. तुम्ही उडू शकता, तुमच्या पाठीवर कोणतेच ओझे नसते. भारतीय शिक्षण संस्थेत मुलांच्या पाठीवर दफ्तराचे इतके ओझे असते की, त नीट चालूसुद्धा शकत नाहीत. बुद्धीच्या विकासासाठी ओझे असायला नको.

असो, जियाच्या आत्महत्येचे कारण दुसरे काही असू शकते. चित्रपटात संधी न मिळणे कारण इतक्या तरुण वयाच्या मुलीला आत्महत्येसाठी प्रेरित करू शकत नाही. इतके चित्रपट बनत आहेत की, भूमिकेची कमतरता नाही. तिने अद्याप टेलिव्हिजनचा दरवाजा ठोठावलाही नव्हता. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण दुसरे काही असू शकते.