आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अमेरिकेत एकता कपूर प्रेमात पडण्याची शक्यता'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालिका जगताची महाराणी एकता कपूर मे महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात व्यवसाय व्यवस्थापनेचा कोर्स करत आहे. जी लोक आपल्या स्वत:च्या कंपनीचे व्यवस्थापक असतात, अशा लोकांसाठी हा अभ्यासक्रम असतो. याचा विषय वेगाने बदलणारे अर्थशास्त्र आहे. या काळात अर्थशास्त्र राजकारणावर भारी आहे. जगातील अनेक प्रमुख नेते कोणत्या न कोणत्या मोठय़ा कंपनीच्या भल्यासाठी राजकीय निर्णय घेत आहेत. बाजार संसदेला चालवत आहेत. अनेक दशकांपासून नेते-उद्योगपती युती आपसी ताळमेळावर काम करत आहेत, उद्योजक नेत्याला निवडणूक जिंकण्यासाठी पैसा आणि साधनं उपलब्ध करून देत आहेत. नेता सत्ता मिळवून उद्योजकाला पैसा कमावण्यासाठी परवाना मिळवून देतो. या घाणेरड्या युतीमध्ये दलाल आणि मोठे अधिकारीदेखील सामील असतात. राज कपूरच्या 'राम तेरी गंगा मैली'च्या कथेचा आधार हीच युती होती.

ती फक्त एक प्रेमकथा नव्हती तर सत्ता आणि पैशाच्या युतीने सांस्कृतिक मूल्यांचा र्‍हास होण्याची कथा होती. त्याच काळात जेपी दत्ताच्या ‘बटवारा’ मध्ये स्वातंत्र्याआधी एक पात्र दलालला म्हणतो की, इंग्रज आणि सरंजामाशाहीचा काळ संपल्यावर दलालांचे कामदेखील संपेन. दलाल म्हणतो, दलाली कोणत्याच काळात संपली नव्हती आणि संपणार नाही. स्वातंत्र्य भारत दलालीचा सुवर्णकाळ सिद्ध झाला आहे.

असो, दोन दशकांपूर्वी एकता कपूरने आपल्या बंगल्याच्या गॅरेजमध्ये एक छोटेसे ऑफिस बनवले होते. त्यासाठी तिने वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले होते. खूप संघर्षानंतर तिला ‘हम पांच’ मालिका मिळाली. त्याचे दिग्दर्शक कपिल कपूर होते. चरित्र अभिनेता कमल कपूरचे ते पुत्र आहेत. हळूहळू मेहनत करून एकता कपूरने मालिका जगतात सासू-सुनेच्या कहाण्यांचा भडीमार केला. अतिनाटकीपणा, लवचीक भावना, कूप्रथेचा प्रचार करत कौटुंबिक तथाकथित प्रतिष्ठेचे गुणगान करत ऐतिहासिक यश मिळवले.