आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट कलावंतांपुढे दिग्दर्शक लाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकचित्रपटाच्या मालकी हक्काला इंटेलॅक्चुअल प्रॉपर्टी राइट्स म्हणतात. अश्लील चित्रपटाच्या मालकी हक्कालादेखील हेच म्हटले जाते. पूर्वी याला निगेटिव्ह हक्क म्हटले जात होते. येथे निगेटिव्हचा अर्थ नकारात्मक नाही, तर तो सेल्युलाइड आहे, यावर कॅमेर्‍याने फिल्म चित्रीत केली जाते. डिजिटल तंत्रज्ञ आल्याने आता सेल्युलाइडची गरज भासत नाही. मात्र मोठय़ा बजेटचे चित्रपट आजदेखील सेल्युलाइडवरच शूट होतात. सिनेमा पटवून देण्याची कला आहे. त्यामुळे सेल्युलाइडचा वापर काल्पनिक दाखवण्यासाठीदेखील होतो. आजच्या घडीला चित्रपट, गीत-संगीत आदी सर्वकाही बौद्धिक मालमत्ता मानले जाते.

चित्रपट उद्योगात ‘बौद्धिकता’ एक धोकादायक शब्द मानला जातो. एवढेच नव्हे तर टीव्ही चॅनलसुद्धा प्रत्येक कार्यक्रमावर आपला एक अधिकारी नियुक्त करतो. त्याचे काम लोकांना समजण्यासारखी मालिका बनवण्याचे असते. संपूर्ण मनोरंजन जगतातच बौद्धिकतेला धोकादायक समजतात. काही चित्रपटांनादेखील असेच म्हणून नकार दिला जातो. सामान्य माणसांना कळणार नाही म्हणून नेहमीच बौद्धिक शक्तीची उपेक्षा केली जाते. याच भ्रामकतेने काहीजण सामान्य माणसाला मूर्ख समजतात आणि बौद्धिक अस्पृश्य समजतात. सगळ्याच क्षेत्रात बौद्धिकतेला कुणास ठाऊक का धोकदायक मानले जाते?

असो, सध्याचे सगळेच कलावंत आता मानधन म्हणून चित्रपटाचा तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत मालकी हक्क मागतात. एका वर्षापूर्वी फक्त पाच वर्षांसाठीच कलावंत चित्रपटाचा हक्क मागत होते. त्यानंतर निर्मात्याचा हक्क राहायचा. आता मालकी हक्काची र्मयादा राहिलेली नाही. चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी कलावंत घेत नाहीत, मात्र यशस्वी झाल्यावर हक्क मागतात.

असो, चित्रपट उद्योगात अनेक निर्मात्यांचे मूले आपल्या घराण्यातील जुन्या चित्रपटांचा सॅटेलाइट अधिकार विकून आपला चरितार्थ चालवत आहेत. मात्र कलावंतांच्या मागणीमुळे दिग्दर्शकांच्या भावी पिढीला हे सुख कलाकारांच्या वंशाजाबरोबर वाटावे लागेल. खरं तर सगळेच कलावंत लोभी नाहीत. मात्र आता त्यांच्यात स्पर्धा इतकी वाढली आहे की, ते आपले महत्त्व आणि शक्तीच्या प्रदर्शनासाठी मालकी हक्क मागतात. आतापर्यंत आदित्य चोप्राकडे कोणीही मालकी हक्क मागितला नव्हता. मात्र आता शाहरुख खानने आगामी चित्रपटासाठी अधिकार मागितल्याचे कळते. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ कधी ‘स्टेशन’वर थांबते का?

खरं तर बॉक्स ऑफिसच्या आकड्यामुळेच कलावंतांमध्ये अधिकार मागण्याचे धाडस आले आहे. दिग्दर्शकाच्या पदाचा मान आता सिनेउद्योगात राहिलेला नाही. त्यासाठी कलावंतांच्या स्टारडमला दोष देणे चुकीचे आहे. दिग्दर्शकाने जर आज आपल्या क्षमतेने चित्रपट यशस्वी करून दाखवला तर त्याचा सन्मान होईल. व्ही. शांताराम, बिमल रॉय, गुरुदत्त, राज कपूर यांनी आजची परिस्थिती स्वीकारली असती का? चित्रपट जगतात नेहमीच दिग्दर्शकाला जहाजाचा कप्तान मानले जात होते. आता तर चित्रपट शिप ऑफ थीसियस झाले आहेत. त्याचे सगळे सुटे भाग कलावंतांच्या इच्छेनुसार बदलले जातात.

आपला चित्रपट कलाकारावर आधारित असतो, याची जाणीव रोहित शेट्टींना आहे म्हणून ते मालकी हक्क दाखवत नाहीत. मात्र या काळात काही दिग्दर्शक आजही कलाकारांच्या भरवशावर नाहीत. तथापि त्यांच्यामुळे कलाकार आहेत, ज्याप्रमाणे शूजित सरकार यांचे ‘विकी डोनर’, आणि ‘मद्रास कॅफे’ आहेत.