आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा यशराज यांचा दोष आहे का ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरत दाभोलकर यांच्या नव्या नाटकाचे नाव 'ब्लेम इट ऑन यशराज' असे आहे. सध्याच्या लग्नावर खूप खर्च केला जातो. श्रीमंती थाट आणि देखावा वाढल्यामुळे लग्नाचे पारंपरिक रूप नाहीसे झाले आहे, असे या नाटकात म्हणण्यात आले आहे. नाटकात कुठेच यशराज किंवा यशराज फिल्म्सचे नाव नाही. मात्र आजच्या फॅशनसाठी महाग आणि दीर्घकाळ चालणार्‍या चालीरीतीमुळे यशराज फिल्म्सचे लग्न आणि 'शिफॉन' आणि 'स्वित्झर्लंड' चित्रपटांना जबाबदार दाखवण्यात आले आहे.
खरं तर आदित्य चोप्रा यांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'च्या आधी सूरज बडजात्या यांचा सलमान खान, माधुरी दीक्षित अभिनीत 'हम आपके हैं कौन' पासून सिनेमा आणि समाजात हा क्रम सुरू झाला आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मध्ये तर एक ठरावीक कहाणी होती. मात्र सूरजचा चित्रपट लग्नाच्या व्हिडिओसारखा होता. खरं तर या चित्रपटाच्या यशानंतर औद्योगिक घराण्यांना कळले की, चित्रपटातूनसुद्धा शंभर कोटी कमवले जाऊ शकतात. आज फिल्म उद्योगाचे वर्णन करणार्‍या पत्रिकेतसुद्धा शंभर कोटींविषयी लिहिले जाते. तथापि मल्टीप्लेक्स येण्याआधी छोट्या चित्रपटगृहात आणि गावातसुद्धा महिनाभर चालणार्‍या या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
लग्नाच्या व्हिडिओसारखा असलेल्या या चित्रपटात ठोस कहाणी किंवा प्लॉट नव्हता. हा चित्रपट बडजात्या कुटुंबानीच अनेक वर्षांपूर्वी बनवलेल्या 'नदिया के पार' या चित्रपटाची नवी आवृत्ती होती. त्यामुळे भरत दाभोलकर साहेबाच्या या नाटकाला 'ब्लेम इट ऑन बडजात्या' असेसुद्धा म्हटले जाऊ शकते. यशराज बॅनर आज सर्वात जास्त आणि वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनवत आहे. उदा- 'इश्कजादे', 'धूम', 'एक था टायगर'. आदित्य चोप्रा मोठय़ा कलाकारासोबत काम करत नव्या कलावंतांनाही संधी देत आहे. त्यांनी लग्नाच्या व्हिडिओसारखे चित्रपट बनवले नाहीत. त्यांनी 'चक दे इंडिया'सारखा राष्ट्रीय भावनेचा चित्रपटसुद्धा बनवला.
असो, महाग आणि मोठ्या लग्नासाठी फक्त सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांना जबाबदार ठरवणे योग्य नाही. आर्थिक उदारमतवादामुळे भारतीय समाजात अनेक बदल होण्यास सुरुवात झाली. मध्यमवर्गाकडेही खूप पैसा येऊ लागला. पश्चिमेची समृद्धी मॉल्स आणि मल्टिप्लेक्सच्या रूपात समोर येत होती. जे आपण लांबून पाहत होतो, त्याला आपण आता स्पर्श करू शकत होतो. हा तो काळ होता, जेव्हा आपण शतकापासून करत आलेल्या काटकसरची शैली सोडून वायफळ खर्चाच्या मायावी जगात आलो होतो. त्यावेळी काही लोक आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी उतावीळ झाले होते आणि सूरजच्या चित्रपटाने समाजाच्या प्रयोगशाळेत सुरू असलेल्या रासायनिक प्रक्रियेत फक्त उत्प्रेरक तत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
त्यावेळी एक नवा व्यवसायसुद्धा सुरू झाला. काही लोकांनी वेडिंग प्लानरचा व्यवसाय सुरू केला. यावर आदित्य चोप्राने 'बँड बाजा बारात' नावाचा चित्रपट बनवला होता. आजकाल तर डेस्टिनेशन वेडिंग होऊ लागल्या आहेत. म्हणजेच वर-वधूचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक एखाद्या तिसर्‍याच शहरात जाऊन आठवडाभर धूमधडाक्याने लग्न साजरे करतात. कोणी बँकॉकला जातात तर कोणी इटलीला जातात. काही लोक भारतातच शहर निवडतात. काही विदेशी लोकांनी जयपूर आणि उदयपूरमध्ये येऊन लग्न केले आहेत. त्याच काळात श्रीमंत घराण्यातील लोकांनी नाचण्या-गाण्यासाठी किंवा फक्त सहभागी होण्यासाठी फिल्मी कलाकारांना मोठी रक्कमसुद्धा दिली. कदाचित त्याच काळात लंडनच्या श्रीमंत लक्ष्मी निवास मित्तलच्या कुटुंबातील युरोपमधील लग्नात जावेद अख्तर साहेबांनी संगीताचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच काळात शाहरुख खाननेसुद्धा मानधन घेऊन लग्नात नृत्य केले होते. शाहरुख आजही म्हणतो की, अभिनय त्याची आवड आहे आणि लग्नात नाचणे हा व्यवसाय आहे. मस्करी करताना शाहरुख असे म्हणाला असावा. या विषयावर बनलेला 'मॉन्सून वेडिंग' नावाचा चित्रपटसुद्धा यशस्वी झाला. लग्न प्रदर्शन करण्याचे एक माध्यम झाले आहे. भारतात शतकापासून गावात लग्न आणि मृत्यूनंतर दिलेल्या पंगतीसाठी कर्ज घेऊन लोक आयुष्यभर कर्ज फेडत असतात. आता शहरात यासाठी संघर्ष केला जात आहे.