आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक थी डायन?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूर आणि विशाल भारद्वाज यांचा इम्रान हाश्मी अभिनीत 'एक थी डायन' चित्रपटाचा अलीकडेच फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. माध्यमांसमोर झालेल्या प्रचार तमाशात दाखवण्यात आले की, डायन कधीच मरत नाही आणि तिची शक्ती तिच्या वेणीत असते, वेणी कापताच ती शक्तिहीन होते. टीव्ही आणि चित्रपट निर्मिती एकता कपूर फक्त पैसा कमावण्यासाठीच इंडस्ट्रीत आल्याचे तिने फार पूर्वीच सांगितले आहे. तिच्या मालिकेत काही महिला पात्र 'डायन'पेक्षा जास्त खराब दाखविल्या जातात. 'डायन'ची संकल्पना एकतासाठी नवी नाही आणि विशाल भारद्वाजनेसुद्धा 'मकडी' नावाचा चित्रपट आपल्या करिअरच्या सुरुवातीला केला होता. मात्र तो मुलांसाठी शिक्षाप्रद चित्रपट होता, त्यात भूत, प्रेत, हडळ काहीच नसते असे सांगण्यात आले होते.
मात्र एकाच दशकात त्यांचा विचार बदलला. त्यांच्या काही चित्रपटांना हवे तसे यश मिळाले नाही म्हणून यशाच्या हव्यासापोटी त्यांनी असा चित्रपट बनवला असावा. या उद्योगात तुम्ही कितीही अयशस्वी चित्रपट बनवा, मात्र तुमच्यासोबत जोपर्यंत कलावंत काम करायला तयार असतात तोपर्यंत कुठूनही पैशाची व्यवस्था होत जाते.
एकीकडे संपूर्ण देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. त्यातच दुसरीकडे एकता आणि विशाल भारद्वाज यांनी 'एक थी डायन' चित्रपट बनवला आणि त्याचा जोरदार प्रचारसुद्धा करत आहेत. एक नागरिक निर्माता आपल्या सामाजिक दायित्वाविषयी इतका निष्काळजी असू शकतो का? महिलांचा आदर न करण्याचा विचार आपल्या मेंदूत इतका जमलेला आहे की आपण 'डायन'सारखे चित्रपट बनवतो? तुम्ही चावट विनोद सादर करूनही पैसा कमवत आहात.
अशा प्रकारचा कचरा जनता पाहते म्हणून असे चित्रपट बनत असतात. त्यामुळेच 'किस्सा तोता-मैना', 'हजार रातें' सारखे चित्रपट बनत आले आहेत. भूतप्रेतात्म्याच्या कथा माणसाला सुरुवातीपासून ऐकविण्यात आल्या आहेत. विकृत इतिहास आणि तर्कहीन पुराणकथांच्या कहाण्या नेहमीच ऐकविल्या जातात. विज्ञानजनित काळात सिनेमानेसुद्धा सुरुवातीला अशा प्रकारचे चित्रपट बनवले होते. अमेरिकेसारख्या आधुनिक देशानेसुद्धा 20 व्या शतकात 'कॅबिनेट ऑफ डॉ कॅलिगरी'सारखा चित्रपट बनवला होता. रक्त पिणारा ड्रॅकुलासुद्धा पश्चिमीनेच तयार केला आहे. भूत-प्रेत कहाण्याचा पितामह अँडगर अँलन पोसुद्धा अमेरिकेचे आहेत. आता तर हॉलीवूडच्या चित्रपटात महिला ड्रॅकुलासुद्धा दाखविल्या जात आहेत. अशा प्रकारच्या चित्रपटात तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जातो. पश्चिमेतून पूर्वीच्या दिग्दर्शकांना हव्या तशा कथा मिळत असतात. सध्या टीव्हीवरील एका मालिकेत हडळ दाखविली जात आहे. ती प्रत्येक भागात म्हणते की, माझ्या वाईट नजरापासून नायिकेला कोणी वाचवू शकत नाही.
खरं तर जगातल्या अनेक देशांत महिलांना हडळ किंवा चेटकीण म्हणून जाळण्यात येते. महान लेखक शरतचंद्र यांच्या लहानपणी एका विधवेचा प्रेमामुळे छळ केला जातो. गावातील नैतिकतेचे ठेकेदार तिला गावातून बाहेर काढून देतात. तिला मदत न करण्याचा हुकूम दिला जातो. बालक शरतला तिची दया येते आणि ते तिला लपून भाकरी घेऊन जातो. मात्र ती खात नाही. ती स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करते. खरंच आपण प्रेम नव्हे तर पाप केल्याचे तिला वाटते.
नैतिकतेच्या ठेकेदारांनी संस्कार आणि धर्माच्या नावावर असा खेळ रचलाय की निरागस लोकसुद्धा स्वत:ला गुन्हेगार समजू लागतो. त्या महिलेचा छळ करणार्‍या लोकांना शिक्षा दिली जात नाही. अशा प्रकारचा न्याय कधीच होत नाही. शेवटी खोट्यांचा बोलबाला असणार्‍या या समाजात 'डायन' चित्रपट बनत राहतील, त्यामुळे आश्चर्य वाटायला नको. 'डायन' आपल्या विचारातच मिसळली आहे. मृत्यूनंतरच्या जगाची कल्पना केली जात आहे, त्या जगातसुद्धा लिंगभेद कायम आहे आणि स्त्रीसोबत अन्याय कायम आहे. मुळात 'हडळ' नाहीच. ती जर असती तर आपल्या नावाने चित्रपट बनवणार्‍यांकडून तिने आपला हिस्सा मागितला असता किंवा त्यांना त्रास दिला असता.