आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही लढाऊ आहात की जुगाडू?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्बास आणि त्यांचा भाऊ मस्तान गेल्या दोन दशकांपासून चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करत आहेत. ते मौलिक कहाण्यावर चित्रपट बनवत नाहीत, तर हॉलिवूडकडून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवतात. खरं तर अनेक लोक हेच काम करत असतात. मात्र, अब्बास-मस्तान खुलेआम सांगतात सुद्धा. अब्बास मस्तान यांच्या चित्रपटात घटनाक्रम वेगाने घडत जातो. वेग त्यांचे मूळ ध्येय आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचे नाव ‘रेस’ म्हणजेच शर्यत असणे विचित्र वाटत नाही. काही दिग्दशर्काची बुद्धी वेगानेच चालते. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे तरुणांना वेगाने गाडी चालवणे आवडते त्याचप्रमाणे त्यांना वेगवान चित्रपट आवडतात आणि अपघातांना निमंत्रण देणे त्यांची जीवनशैली ठरते.

हा चित्रपट स्लो आहे आणि तो चित्रपट फास्ट आहे, असे प्रेक्षकसुद्धा चित्रपटाविषयी बोलत असतात. चित्रपट निर्मिती तर 24 फ्रेम प्रतिसेकंदाच्या वेगानेच होते. खरं तर प्रेक्षक बोर करणार्‍या चित्रपटांना स्लो आणि मनोरंजक चित्रपटांना फास्ट म्हणतात. चार तासाच्या ‘संगम’ला लोकांनी लांब म्हटले नाही. कारण, तो मनोरंजक चित्रपट होता. तथापि तो फक्त प्रेम त्रिकोणावर आधारित होता, संपूर्ण चित्रपटात घटनासुद्धा जास्त नव्हत्या. चाळीस मिनिटांच्या क्लायमॅक्समध्ये तीन पात्र फक्त आपापली बाजू मांडतात. चार तासांच्या चित्रपटात एका विमानाचा अपघात होतो आणि त्यात नायक योगायोगाने वाचतो ही एक घटना आहे. नायक, नायिकेचे हिंदीमधील पत्र वाचू शकत नाही हाच संपूर्ण चित्रपटाचा आधार आहे. कारण, त्याला ती भाषा येत नसते. त्याचा मित्र त्याला पत्र वाचून दाखवतो. मात्र, हे पत्र आपल्यासाठी लिहिलेले आहे, हे नायकाला सांगत नाही. कारण, आपल्या बालपणीच्या मित्राचे एकतर्फी वेडे प्रेम त्याला माहीत असते. याच कथेत अनेक वर्षांनंतर एक प्रेमपत्र नायकाला नायिकेच्या सामानात सापडते. तेव्हा नायक म्हणतो की, जोपर्यंत लिहिणार्‍याचे नाव माहीत होणार नाही तोपर्यंत निखार्‍यांवर चालण्याची जाणीव त्याला होत राहील. कहाणीत प्रेमपत्राच्या महत्त्वामुळे हसरत जयपुरी यांनी चित्रपटासाठी गाणे लिहिले होते- ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर कि तुम नाराज न होना’. ‘संगम’ फक्त आपल्या सादरीकरणामुळे मनोरंजक ठरला होता. तथापि राजकपूरने जेव्हा सव्वा चार तासाचा दार्शनिक ‘मेरा नाम जोकर’ बनवला तेव्हा मनोरंजक नाही म्हणून प्रेक्षकांनी तो नाकारला. सध्याच्या कालखंडात वेगाला महत्त्व दिले जाते. एवढेच नव्हे तर काही लोकांना ‘तेज’ म्हटले जाते. खरं तर आज जुगाडू माणसाला ‘तेज’ म्हणतात, जो येन-केन-प्रकारेन यश मिळवतो. सध्याच्या जीवनशैलीत लढाऊ माणसापेक्षा जुगाडू माणसाला चांगले समजले जाते. लढाऊ व्यक्ती आखाड्याच्या भाषेत पहिलवान असतो. म्हणजेच तुम्ही त्याला पाडू शकता. मात्र चित करू शकत नाही.

आज राजकारणातसुद्धा जुगाडू लोक आहेत. चतुर व्यक्तीला समाजात आजकाल बुद्धिमान समजले जाते. शेवटी चातुर्य यशासोबत जोडले आहे, तर बुद्धि जीवन दर्शनासोबत. अब्बास मस्तान आणि त्यांच्यासारखे इतर दिग्दर्शक तर्कापेक्षा वेगाला जास्त महत्त्व देतात. चित्रपटाचे प्रतिमान आणि मापदंड बदलले आहेत. आता यशासाठी गुणवत्ता आवश्यक राहिलेली नाही. आपण समाजात पाहतो की, बडबड्या लोकांना बुद्धिमान समजले जाते. याचप्रमाणे कवितेतसुद्धा ज्यांच्या ओळी सोप्या असतात त्यांनाच कवी समजले जाते. समाजाच्या मजबूत प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. समाजातील लोकप्रिय जुगाडू स्वभावाविषयी असे म्हणतात की, माणसात असलेला जुगाडू स्वभाव स्वत: त्याच्या अस्तित्वासाठी कधी घातक ठरेल, हे त्यालाच माहीत नसते. खरं तर जीवन लढाऊपणाचे नाव आहे जुगाडूपणाचे नाही. ‘गति महत्वाची नाही, मती आहे.तुम्ही लढाऊ आहात की जुगाडू?

अब्बास आणि त्यांचा भाऊ मस्तान गेल्या दोन दशकांपासून चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करत आहेत. ते मौलिक कहाण्यावर चित्रपट बनवत नाहीत, तर हॉलीवूडकडून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवतात. खरं तर अनेक लोक हेच काम करत असतात. मात्र, अब्बास-मस्तान खुलेआम सांगतात सुद्धा. अब्बास मस्तान यांच्या चित्रपटात घटनाक्रम वेगाने घडत जातो. वेग त्यांचे मूळ ध्येय आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचे नाव ‘रेस’ म्हणजेच शर्यत असणे विचित्र वाटत नाही. काही दिग्दशर्काची बुद्धी वेगानेच चालते. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे तरुणांना वेगाने गाडी चालवणे आवडते त्याचप्रमाणे त्यांना वेगवान चित्रपट आवडतात आणि अपघातांना निमंत्रण देणे त्यांची जीवनशैली ठरते.

हा चित्रपट स्लो आहे आणि तो चित्रपट फास्ट आहे, असे प्रेक्षकसुद्धा चित्रपटाविषयी बोलत असतात. चित्रपट निर्मिती तर 24 फ्रेम प्रतिसेकंदाच्या वेगानेच होते. खरं तर प्रेक्षक बोर करणार्‍या चित्रपटांना स्लो आणि मनोरंजक चित्रपटांना फास्ट म्हणतात. चार तासाच्या ‘संगम’ला लोकांनी लांब म्हटले नाही. कारण, तो मनोरंजक चित्रपट होता. तथापि तो फक्त प्रेम त्रिकोणावर आधारित होता, संपूर्ण चित्रपटात घटनासुद्धा जास्त नव्हते. चाळीस मिनिटांच्या क्लायमॅक्समध्ये तीन पात्र फक्त आपापली बाजू मांडतात. चार तासांच्या चित्रपटात एका विमानाचा अपघात होतो आणि त्यात नायक योगायोगाने वाचतो ही एक घटना आहे. नायक, नायिकेचे हिंदीमधील पत्र वाचू शकत नाही हाच संपूर्ण चित्रपटाचा आधार आहे. कारण, त्याला ती भाषा येत नसते. त्याचा मित्र त्याला पत्र वाचून दाखवतो. मात्र, हे पत्र आपल्यासाठी लिहिलेले आहे, हे नायकाला सांगत नाही. कारण, आपल्या बालपणीच्या मित्राचे एकतर्फी वेडे प्रेम त्याला माहीत असते. याच कथेत अनेक वर्षांनंतर एक प्रेमपत्र नायकाला नायिकेच्या सामानात सापडते. तेव्हा नायक म्हणतो की, जोपर्यंत लिहिणार्‍याचे नाव माहीत होणार नाही तोपर्यंत निखार्‍यांवर चालण्याची जाणीव त्याला होत राहील. कहाणीत प्रेमपत्राच्या महत्त्वामुळे हसरत जयपुरी यांनी चित्रपटासाठी गाणे लिहिले होते- ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर कि तुम नाराज न होना’. ‘संगम’ फक्त आपल्या सादरीकरणामुळे मनोरंजक ठरला होता. तथापि राजकपूरने जेव्हा सव्वा चार तासाचा दार्शनिक ‘मेरा नाम जोकर’ बनवला तेव्हा मनोरंजक नाही म्हणून प्रेक्षकांनी तो नाकारला. सध्याच्या कालखंडात वेगाला महत्त्व दिले जाते. एवढेच नव्हे तर काही लोकांना ‘तेज’ म्हटले जाते. खरं तर आज जुगाडू माणसाला ‘तेज’ म्हणतात, जो येन-केन-प्रकारेन यश मिळवतो. सध्याच्या जीवनशैलीत लढाऊ माणसापेक्षा जुगाडू माणसाला चांगले समजले जाते. लढाऊ व्यक्ती आखाड्याच्या भाषेत पहिलवान असतो. म्हणजेच तुम्ही त्याला पाडू शकता. मात्र चित करू शकत नाही.

आज राजकारणातसुद्धा जुगाडू लोक आहेत. चतुर व्यक्तीला समाजात आजकाल बुद्धिमान समजले जाते. शेवटी चातुर्य यशासोबत जोडले आहे, तर बुद्धि जीवन दर्शनासोबत. अब्बास मस्तान आणि त्यांच्यासारखे इतर दिग्दर्शक तर्कापेक्षा वेगाला जास्त महत्त्व देतात. चित्रपटाचे प्रतिमान आणि मापदंड बदलले आहेत. आता यशासाठी गुणवत्ता आवश्यक राहिलेली नाही. आपण समाजात पाहतो की, बडबड्या लोकांना बुद्धिमान समजले जाते. याचप्रमाणे कवितेतसुद्धा ज्यांच्या ओळी सोप्या असतात त्यांनाच कवी समजले जाते. समाजाच्या मजबूत प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. समाजातील लोकप्रिय जुगाडू स्वभावाविषयी असे म्हणतात की, माणसात असलेला जुगाडू स्वभाव स्वत: त्याच्या अस्तित्वासाठी कधी घातक ठरेल, हे त्यालाच माहीत नसते. खरं तर जीवन लढाऊपणाचे नाव आहे जुगाडूपणाचे नाही. ‘गति महत्वाची नाही, मती आहे...’