Home »Feature» Feature Story By Jaiprakash Choukase

लढवय्ये अमिताभ बच्चन

जयप्रकाश चौकसे | Feb 16, 2013, 10:31 AM IST

  • लढवय्ये अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन आपल्या कंपनीसाठी एक मालिका बनवणार आहेत, त्यात ते स्वत: मुख्य भूमिका करणार आहेत. चौदा वर्षांपूर्वी त्यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आर्थिक संकटातून मुक्त व्हायचे असेल तर पुन्हा अभिनय सुरू करा, असा सल्ला त्यांचा मित्र मुकेश अंबानीने त्यांना दिल्याचे बोलले जाते. त्याचवेळी त्यांनी यशराज चोप्रांची भेट घेतली होती, त्यांचा मुलगा आदित्य त्यावेळी ‘मोहब्बतें’ चित्रपट बनवत होता. त्याचवेळी सिनर्जी कंपनीच्या सिद्धार्थ बसूने त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ ची संकल्पना ऐकवली आणि संचालनाची विनंती केली. अशा प्रकारे त्यांनी छोट्या पडद्यावर प्रवेश केला आणि घवघवीत यश मिळवले. त्यामुळे टीव्हीसाठी त्यांचे काही बनवणे एका प्रकारे आभार व्यक्त करणे आहे. त्यांच्या व्यावसायिक बुद्धीला माहीत आहे की, टेलिव्हिजन उद्योग वार्षिक तीस हजार कोटी रुपयांशिवाय होत आहे. या डेलीसोपमुळे त्यांना फायदा तर होईलच शिवाय मोठय़ा पडद्यावर शक्यतो न साकारलेल्या भूमिका ते छोट्या पडद्यावर करू शकतील. चित्रपट इंडस्ट्रीत आज एकापेक्षा जास्त नायक असलेले चित्रपटच आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक ठरू शकतात.

70 वर्षांच्या वयात अनेक आजाराने ग्रासलेले अमिताभ बच्चन शिस्त, संयम आणि दृढ इच्छाशक्तीमुळेच सक्रिय आहेत. ही इच्छाशक्ती त्यांना आपल्या आई-वडिलांकडूनच मिळालेली आहे, त्यामुळे ते संघर्ष करत आहेत. त्यांनी आपल्या अभिनय प्रतिभेचा प्रभावी वापर केला आणि कधी विश्रांती घेतली नाही. या यात्रेत त्यांनी काही लोकांना दुखावलेही असेल. कारण यशाच्या यात्रेत निर्दयीपणा विचारांचा अविभाज्य अंग बनत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, सगळ्या लोकांमध्ये पूर्ण वेळ चांगले होऊन राहणेही शक्य नसते, महत्त्वाकांक्षेचा श्वेत घोडा बेभान पळत असताना त्याच्या पायाखाली कोणी तुडवले गेल्याची कल्पना त्याला नसते.

खरं तर आयुष्याच्या भव्य न्यायालयात आपण सगळेच आरोपी आहोत, त्यामुळे कोणाला कोणाविषयी निर्णय देण्याचा अधिकारच नसतो. राजकारणात एखादा पक्ष किंवा धोरणाविषयी अमिताभ यांचे सर्मपित नसणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. ज्याप्रमाणे मतदार प्रत्येक निवडणुकीत आपला विचार बदलतो आणि कित्येकदा विचारहीनतेने ग्रस्त होऊन शिक्का मारतो.

अमिताभ यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात डझनभर अयशस्वी चित्रपटात काम केले. त्यामुळे 1971 मध्ये आलेल्या ‘मेला’ चित्रपटातून त्यांना काढून संजय खानला घेण्यात आले होते. अशा प्रकारचे अनुभव कोणत्याही व्यक्तीला नाउमेद करू शकतात. मात्र बच्चन निराश झाले नाही. याच प्रकारे बोफोर्स घोटाळ्याच्या अफवासुद्धा त्यांना संपवू शकल्या असत्या. आपल्या कंपनीच्या तोट्यामुळेदेखील ते नैराश्यात जाऊ शकले असते. मात्र ते निरंतर काम करत राहिले. आयुष्यात सैदव काम करत राहण्याशिवाय दुसरा मार्गदेखील नसतो.

सलीम-जावेद यांच्या ‘जंजीर’मधून अमिताभ यांना पहिले यश मिळाले. त्यानंतर या टीमने अनेक चित्रपटांत यशाचे कीर्तिमान रचले. सलीम-जावेद यांच्या पात्रांमध्ये आक्रोश होता. तो सामाजिक जीवनाच्या अन्यायाविरुद्ध नसून वैयक्तिक असायचा. असो, आपल्या परिस्थितीनुसार ते पात्र थोडे निर्दयीसुद्धा होते. या टीमच्या शेवटच्या ‘शक्ती’ चित्रपटात नायक आपल्या वडिलांच्या कर्तव्यदक्षतेला समजून घेत नाही. शेवटच्या दृश्यात वडील त्याला गोळी मारतात तेव्हा त्याला कळते की वडील त्याच्यावर पहिल्यापासून प्रेम करत होते. मात्र ते कर्तव्याशीसुद्धा बांधलेले होते. ही पात्र अमिताभ बच्चन यांच्या मनात घर करून बसली असतील का? की जीवनाच्या अनुभवातून ते असे घडले आहेत, ज्याप्रमाणे साहिर साहेबांनी लिहिले आहे, ‘तजुरबाते हवादिस की शक्ल में जो कुछ दुनिया ने दिया है, लौटा रहा हूं मैं’.

माणसाचे मन मानसरोवराप्रमाणे आहे. त्यावर डोंगरामागून येणार्‍या किरणामुळे दिवसा पाण्याच्या विविध रंगांचा भास होतो. व्यक्तीसुद्धा परिस्थितीमुळे आपले वैविध्य उघड करतो. त्यामुळे एखाद्यावेळी एखाद्या कामामुळे एखाद्या व्यक्तीविषयी कोणतेही ठोस मत तयार करणे योग्य नाही. अमिताभ यांचे आकलन फक्त त्यांचा अभिनय, आयुष्यात त्यांचा लढाऊपणा आणि धाडस याच्या आधारावरच करायला हवे आणि येथे ते योग्य ठरतात. खरं तर बहुतांश लोक आजारामुळेच निराश होतात. अमिताभ यांच्यावर आतापर्यंत 17 वेळेस शस्त्रक्रिया झाली आहे. हा त्यांच्या अभिनयाची कमाल आहे की ते शक्तिशाली व्यक्तीची प्रतिमा सादर करतात किंवा त्यांचा लढाऊपणा त्यांच्या अभिनयाला ताकद देतो.

Next Article

Recommended