आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांचा दबाव निर्णायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य चोप्राच्या ‘गुंडे’ सिनेमात अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह काम करत आहेत. दोघेही यशस्वी कलाकार होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सिनेमा उद्योग नवीन कलाकारांना तयार करत आहे कारण सध्याचे सुपरस्टार पन्नाशीच्या जवळ जात आहेत. मात्र वाढत्या वयामुळे त्यांच्या लोकप्रियतेत फरक पडला नाही. खरं तर . त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचे मानधन इतके जास्त आहे की, निर्मात्यांचा नफा कमी झाला आहे. चित्रपट निर्मितीत ते हस्तक्षेपसुद्धा करत असतात आणि निर्मात्यांना त्यांचे दास व्हावे लागते. त्यामुळे प्रस्थापित आणि दिग्गजांच्या बळावर वर्षभर शंभर कोटींचे चित्रपट बनवले जाऊ शकत नाहीत. करण जोहरनेसुद्धा आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांना सादर केले. आता यातील दोन कलाकारांसोबत ते एकता कपूरच्या भागीदारीत चित्रपट बनवत आहेत. ‘विकी डोनर’च्या आयुष्मान खुराणासोबत आदित्य चोप्राने तीन चित्रपटांचा करार केला आहे. इलियाना डीक्रूजला ‘बर्फी’मध्ये सादर केले आहे.

रणवीर सिंहकडे आज संजय लीला भन्साळींचा रोमियो जुलिएट प्रेरित चित्रपट आहे. आज अर्जुन कपूर आणि आयुष्मान यांना सोबत घेऊन चित्रपट बनवला जाऊ शकतो. वरुण धवनसोबतसुद्धा आज दुसर्‍या तरुण कलाकाराला घेऊन चित्रपट बनवला जाऊ शकतो. मात्र दोन-तीन वर्षांतच लोकप्रियता मिळल्यानंतर दोन दिग्गज कलाकारांना घेऊन चित्रपट बनवणे कठीण होईल. ज्याप्रमाणे आज सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि आमिर खानसोबत चित्रपट बनवू शकत नाहीत. दिग्गज कलाकारांचा अहंकारी तितकाच मोठा असतो. त्याला आपले बाजारमूल्य माहीत असते. अनेक कलाकार असलेले चित्रपट केल्याने जास्त फायदा मिळणार नाही म्हणून तो असे चित्रपट करत नाही. आज रणवीर कपूरने राजकुमार हिराणीच्या ‘पीके’ला पसंती दिली. मात्र आमिर खानसोबत समांतर भूमिका करण्यास नकार दिला.

आपण कल्पना करू शकतो की, तिन्ही खान एकाच चित्रपटात एकत्र आले तर त्याचा नफा किती होईल. विदेशामध्ये यशस्वी कलाकार सहज एकमेकांसोबत काम करतात. या कारणामुळेच जास्त कलाकार असलेल्या चित्रपटात कमी अनुभव असलेल्या लोकांना घ्यावे लागते. भारतीय चित्रपट उद्योगात ही परंपरा नवीन नाही. मेहबूब खान यांनी दिलीप कुमार आणि राज कपूरसोबत 1949 मध्ये ‘अंदाज’ बनवला होता. त्यावेळी दोघेही नवोदित कलाकार होते. मात्र 1964 मध्ये राज कपूर यांनी प्रयत्न केला की त्यांच्या ‘संगम’मध्ये दिलीप कुमारांनी स्वत: भूमिका निवडावी आणि बाजार भावापेक्षा जास्त पैसा घ्यावा. मात्र दिलीप कुमारने नकार दिला. त्यामुळे राज कपूरला राजेंद्र कुमारांना घेऊन समाधान मानावे लागले.

दिलीप कुमारने स्वत: आपल्या ‘गंगाजमना’मध्ये दुसर्‍या नायकाची भूमिका आपल्या भावाला दिली, जे साधारण अभिनेते होते. अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर असताना शशी कपूरला त्यांच्यासोबत काम मिळत होते. कारण इतर कोणताच अभिनेता अमिताभ बच्चनसोबत छोटी भूमिका करायला तयार नव्हता.

सारांश असा की, यशस्वी सितारे एकमेकांसोबत काम करू इच्छित नसतात. कारण त्यांना भीती असते की, पटकथेच्या मागणीनुसार जर चित्रपटात मार खाण्याचे दृश्य करावे लागले तर त्यांचे चाहते नाराज होतील. या प्रकरणात अदृश्य निनावी चाहत्यांचा दबाव खास असतो. सलमान खान आणि आमिर खान यांनी राजकुमार संतोषी यांच्या ‘अंदाज अपना अपना’मध्ये काम केले होते. कारण त्यावेळी दोघेही आजच्यासारखे यशस्वी कलाकार नव्हते. ‘हिम्मतवाला’ सारख्या साधारण मसाला चित्रपटाची नवी आवृत्ती बनत आहे. मात्र ‘अंदाज अपना अपना’मधील सलमान आणि आमिरसोबत नवी आवृत्ती बनवली जाऊ शकत नाही. आपल्या येथे तर राजकुमारसारखे कलाकार झाले आहेत. जे सहकार्‍यांना जुनियर कलाकार म्हणणे आपला मोठेपणा समजत होते. ज्याप्रमाणे निनावी अदृश्य चाहता निर्णायक असतो, त्याचप्रमाणे राजकारणातसुद्धा प्रतिमा महत्त्वपूर्ण असते. नाहीतर आगामी निवडणुकीत तिसरा विकल्प नसल्यामुळे काँग्रेस आणि भाजप मिळून लढू शकतात आणि देशाला मजबूत सरकार देऊ शकतात.

या दोन्ही पक्षांमध्ये फक्त धर्मनिरपेक्षतेबाबतच मतभेद आहे, नाही तर इतर प्रकरणात दोन्ही पक्षात भ्रष्टाचाराचे दोषी आहेत. सत्तेच्या बाहेर राहून भाजपचे सर्मथक पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत होते. मात्र सत्तेवर येताच अटलबिहारी वाजपेयी यांनी समझौता एक्स्प्रेस चालवली. क्रिकेट दौरे सुरू केले. आज अणुबॉम्ब असलेले दोन देश युद्ध करू शकत नाहीत. या दोन्हींचे एकत्र येणे दोन ध्रुवांनी एकत्र येण्यासारखे अशक्य आहे. मात्र सिद्धांतहीनतेच्या या धोकादायक काळात काहीही होऊ शकते. मात्र दोन्ही पक्षांचे चमचे असे होऊ देणार नाहीत. सगळ्या ठिकाणी व्वा, व्वा करणार्‍या चमच्यांची रोजीरोटी यांना विरोधी बनवून ठेवल्यामुळेच मिळते. ही प्रवृत्ती संघटित गुन्हेगारी जगतातसुद्धा आहे. ‘छुटभैये’ दोन पक्षांना एक होऊ देत नाही.