आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वानंदचे गीत आणि कृष्णाचे धाडस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्वी आणि अर्थपूर्ण चित्रपट ‘काय पो छे’ मध्ये स्वानंद किरकिरे यांचे एक गीत आहे, ‘रुठे ख्वाबों को मना लेंगे, कटी पतंगों को थामेंगे, सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांजा, रिश्ते पंखों को हवा देंगे, रिश्ते दर्द को दवा देंगे, रिश्ते जान भी मांगें तो कुरबान कर देंगे..’ हा गीतकार वैयक्तिक जीवनातसुद्धा खूप संवेदनशील आहे. त्याला नाते जपण्याची जाण आहे. आपल्यामुळे कुणाचे भले होत असेल तर अशा गरजूची मदत करण्यास तो जीवतोड मेहनत घेतो. 15 मार्चला स्वानंद किरकिरे, संगीतकार शांतनू मोयत्रा, गायक शान आणि विनोदी कलाकार विक्रम सरया यांनी मिळून एक कार्यक्रम सादर केला. यातून आलेला सर्व पैसा त्यांनी 23 वर्षीय कृष्णा पाटीलला दिला. कृष्णाची ‘के 2’ शिखर सर करण्याची इच्छा आहे. यापूर्वी तिने फक्त 19 वर्षांच्या वयात एव्हरेस्ट सर केले होते.

‘के 2’ सर्वात कठीण शिखर मानले जाते. ते 8611 मीटर उंच आहे. एव्हरेस्टपेक्षा याची उंची थोडी कमी आहे मात्र याची चढाई अवघड आहे. यावर चढण्यासाठी तिला चीन आणि पाकिस्तानचीसुद्धा परवानगी घ्यावी लागेल. या शिखरावर पाकिस्तान, चीन आणि भारताचा अधिकार आहे.

मुंबईत राहणारे लोक थोडेच उंच असलेल्या मलाबार आणि पाली हिल्सलासुद्धा डोंगर म्हणतात. कृष्णा लहानपणापासून पर्वत सर करत आली आहे. खरं तर शिखरावर पोहोचणे माणसाच्या महत्त्वाकांक्षाचे प्रतीक आहे. मानवी धाडसापुढे तर डोंगरसुद्धा ठेंगणे आहे. पर्वत माणसाच्या चेतनेत नेहमी उंच आणि अशक्यचे प्रतीक राहिले आहे. म्हणूनच एक म्हण आहे की, ‘अब आया उंट पहाड के नीचे’ आणि एक म्हण हीसुद्धा आहे की, ‘मोहम्मद साहेब पहाड के पास न जाएं तो पहाड उनके पास आ जाता है’, खरे तर माणसाच्या प्रयोगशाळेत जन्मलेल्या भाषेला कोणतीच मर्यादा नसते. आकाशसुद्धा त्याच्यासमोर ठेंगणे आहे. माणसाने शोधून काढलेली भाषा देवाच्या चमत्काराप्रमाणे आहे.

स्वानंद किरकिरे आणि त्यांचे मित्र भारताच्या अनेक शहरांत कार्यक्रम सादर करून धाडसी लोकांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहेत. त्यामुळे त्यांना ‘रिश्ते दर्द को दवा देंगे, रिश्तों का उलझा मांजा सुलझा लेंगे’ लिहिण्याचा अधिकार आहे. चांगला माणूसच चांगला कवी होऊ शकतो, या ग्रीक विचारवंत लांजाइन्सच्या ओळींना स्वानंद खरे ठरवू पाहत आहे.

कृष्णा पाटील कितीही मोठे शिखर चढो, मात्र नेत्यांच्या छोट्या मनोवृत्तीवर उपचार होऊ शकत नाही. कवी नात्यांतील गुंता आणि नेता किंवा मठाधीश माणसाच्या नात्याचा गुंता करतात. हेच त्यांचे काम आहे आणि आदर्शाची गाणी म्हणणे कवीचा धर्म आहे. काही वर्षांपूर्वी असे कार्यक्रम करण्याचा सल्ला सलमान खानने, शाहरुख खान आणि आमिर खानला दिला होता, पण आपल्यातच मग्न असलेले लोक भलत्याच गोष्टीकडे वाहत गेले. मात्र आजसुद्धा हे काम होऊ शकते. पाकिस्तान सरकारने अशा प्रकारच्या कार्यक्रमाला स्वीकृती दिली तर तेथील तरुण आपला सगळा पैसा अशा कलाकारांवर खर्च करतील.

असो, चित्रपट उद्योगातील सगळेच कलाकार किंवा संगीतकार आपला थोडा वेळ राष्ट्राच्या निर्मितीत देऊ शकतात. या परोपकारामुळे त्यांची वैयक्तिक लोकप्रियतासुद्धा वाढेल. सलमान खानचा एनजीओ हे काम करत आहे. कदाचित याच प्रार्थनेमुळे अमेरिकेच्या रुग्णालयाने तीन दिवसांपूर्वीच सलमानला जवळजवळ निरोगी असल्याचा रिपोर्ट दिला आहे. असो, देशात अनेक संस्था मदत देण्याचे काम करत आहेत. माणसाच्या दु:खाला माणूस वाटून घेत आहे. नैराश्यात आपण हे विसरायला नको की, आजसुद्धा चांगल्या माणसाची संख्या वाईट लोकांपेक्षा जास्त आहे. सगळी चांगली माणसे एका ठिकाणी नाहीत आणि वाईट लोक एकमेकांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत. एक राजकीय पक्षाचा नेता विरोधी पक्षाच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला माहीत असते की, जेव्हा विरोधी पक्ष सत्तेत येईल तेव्हा त्याला वाचवेल. हा खेळ शतकापासून असाच सुरू आहे.

असो, स्वानंद किरकिरे आणि त्यांचे मित्र आपल्या गटाला ‘बावरा’ म्हणतात, दुनियादारीच्या पलीकडे काही तरी वेगळे करण्याचे धाडस वेड्या लोकांमध्येच असते. यावर निदा फाजली यांनी लिहिले आहे की, ‘सोचसमझ वालों को मौला थोडी नादानी दे’.