आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बी. ए. पास’ सिनेमातील डॉक्टरेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचा काळ युवा केंद्रित आहे. बाजाराची ताकद तरुणवयालाच एक आकर्षक वस्तू बनवून नाण्याच्यारूपात बाजारात चालवत आहे. या प्रवाहापासून सिनेमा दूर कसा राहू शकतो. त्यानेदेखील युवा कहाण्यांना महत्त्व देणे सुरू केले. खरं तर प्रत्येक कालखंडात तरुण नायकांचेच सिनेमे बनत आले आहेत. असो, युवा केंद्रित चित्रपट नेहमी प्रेमकथेवरच असतात किंवा मौजमस्ती करणारे नायक सादर केले जातात. अयान मुखर्जी यांचा रणबीर कपूरने भूमिका केलला ‘वेक अप सिड’ तारुण्यात पाऊल ठेवणार्‍या तरुणाचा चित्रपट होता आणि त्याचा आगामी ‘जवानी दिवानी है’ पूर्णत: तारुण्यात पोहोचाल्याचा चित्रपट असू शकतो.

असो, अजय बहल यांचा ‘बीए पास’ सुद्धा युवा केंद्रित सिनेमा आहे. मात्र हा प्रेमकथा आणि मौजमस्तीवर बनलेला नाही. रंग दे बसंती प्रमाणे हा तारुणाच्या विचारात अमूलाग्र बदल आणि त्याच्या कायापालटचाही चित्रपट नाही. याचे मुख्य पात्र वेक अप सिड च्या नायकापेक्षा कमी वयाचे आहे. मात्र त्याच्या बालपणावर वयस्कता थोपटली आहे. गरीब तरुणांच्या मनात हिंसा भरून त्याच्या द्वारे विध्वंस घडवून आणला जातो. तसेच या तरुण होणार्‍या मुलाला दहशतवादी बनवले जात नाही.

आर्थिक उदारीकरणानंतर भारतात पहिल्यापासून असलेल्या आर्थिक दरीला उदारीकरणाने आणखीनच भयावह केले आहे. भ्रष्टाचार आणि आर्थिक उदारीकरणाच्या जुगलबंदीने समाजात मूल्यांचा ह्रास केला आहे. एक वर्ग सरंजामशाही लोकांप्रमाणे मौजमजा करत आहेत आणि त्याच्या आर्थिक जाळ्यात तरुण वर्ग अडकतो आहे. या गोष्टीवरून हा मार्क्‍सवाद किंवा इतर गंभीर दार्शनिक चर्चेचा चित्रपट असल्याचे वाटेल. मात्र, हा एक मनोरंजक चित्रपट आहे. थ्रिलरप्रमाणे त्याला सादर करण्यात आले आहे म्हणून प्रेक्षकांना तो खिळवून ठेवतो. ही एका किशोरवयातील मुलाची कथा आहे, त्याचा निरागसपणा विकत घेतला जातो, त्या मुलाच्या दोन बहिणीची कथा-व्यथासुद्धा यात आहे.

एका मध्यमवर्गीय दांपत्याचा कार अपघातात मृत्यू होण्यापासून चित्रपटाला सुरुवात होते. मुलाची जबाबदारी नातेवाईक घेतात त्याच्या दोन बहिणीची जबाबदारी इतर नातेवाईक घेतात. गरिबीमुळे मुलांची विभागणी केली जाते. किशोरवयीन मुलाचा दाखला सकाळच्या कॉलेजमध्ये केला जातो. बी.ए.च्या या विद्यार्थ्याला आश्रय देणार्‍या या कुटुंबामध्ये नोकराप्रमाणे वागणूक मिळते. बुद्धिबळाची आवड असणारा हा किशोर वेळ मिळेल तेव्हा एका जुन्या बागेत जाऊन बुद्धिबळ खेळत असतो. त्या जागेची राखण करणार्‍या व्यक्तीलासुद्धा बुद्धिबळाची आवड असते. मात्र, हे दोघे बुद्धिबळाच्या वेगवेगळ्या पद्धती मानणारे असतात. जमीन राखणार्‍याची ही भूमिका दिब्येंदू भट्टाचार्यने एका निष्णात कलावंताप्रमाणे साकारली आहे. किशोर मुलाच्या भूमिकेत शादाब कमलचा हा पहिला चित्रपट आहे. त्याने आत्मीयतेने ही भूमिका केली आहे. चित्रपटाची अतिशय महत्त्वाची भूमिका शिल्पा शुक्लाने साकारली आहे. तिला आपण ‘चक दे इंडिया’ मध्ये अनुभवी हॉकी खेळाडूच्या भूमिकेत पाहिलेले आहे. मात्र, या चित्रपटात तिने विलक्षण अभिनय केला आहे. आयटम साँग करणार्‍या मोठय़ा तारकांना शिल्पा शुक्लाकडून पडद्यावर अंगप्रदर्शन न करता कशा प्रकारे मादकता सादर केली जाते हे शिकले पाहिजे.

या चित्रपटात दीप्ती नवलने फक्त दोन छोटे दृश्य केले आहेत. मात्र, तिच्या डोळ्यातील एकटेपणाचा भाव प्रेक्षकांच्या मनात प्रवेश करून जातो. दीर्घकाळ कोमामध्ये असलेल्या नवर्‍याच्या सेवेने तिला आजारी करून टाकले आहे. ती शारीरिक रूपाने चांगली असूनही आतून खचली आहे. कशा प्रकारे अनेक पातळ्यांवर केलेल्या उपवासामुळे एक स्त्री कोरड्या नदीप्रमाणे तपस्विनी होते आणि उपवास तोडण्याच्या अयशस्वी प्रयत्नाच्या एका क्षणाचे काय महत्त्व असते, हे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने एकरसता तोडण्याच्या एका छोट्या दृश्यात केले आहे.

मध्यमवर्ग आणि भ्रष्टाचारापासून श्रीमंत झालेल्या वर्गाच्या इच्छेचा हा चित्रपट मोहन सिक्का यांची लघुकथा ‘रेलवे आंटी’ वर आधारित आहे. जी हार्पर कॉलिन्सच्या ‘देल्ही नोअर’ नावाच्या संग्रहात प्रकाशित झाली होती. याच्या नव्या आवृत्तीच्या पहिल्या पृष्ठावर ‘बी.ए. पास’ चे चित्र आहे. कूपमंडूक सेन्सॉरने चित्रपटाला गरज नसतानाही ‘वयस्क’ प्रमाणपत्र दिले आहे. आज वयस्क चित्रपटाचे प्रसारण अधिकार टीव्हीवर विकले जात नाहीत, त्यामुळे या चित्रपटाला प्रदर्शनासाठी कोणी विकत घ्यायला तयार नाही. चित्रपटाच्या नव्या आर्थिक समीकरणाचे हे दु:ख म्हणावे लागेल. प्रतिभावंत अजय बहलने चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये बनवला आहे. मात्र, सध्या प्रमोशनाचा खर्च चित्रपट बनवण्यापेक्षा जास्त आहे. अशा प्रकारच्या सार्थक चित्रपटासाठी काही भागीदार पुढे येऊ शकतात.

एक्स्ट्रा शॉट - 1977 मध्ये आलेल्या ‘जालियनवाला बाग’मधून दीप्ती नवलने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.