आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त बिरजू आहे का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’ च्या पहिल्या दृश्यात एक म्हातारी एका नहरीचे उद्घाटन करते आणि त्या नहरीमधून पाणी वाहायला लागते. पूर्ण गाव खुश असते. मात्र, त्या म्हातारीला नहरीमधील पाणी लाल होताना दिसू लागते. फ्लॅश बॅकमध्ये दाखवण्यात येते की, युवा डाकू बिरजू एका नवरीला मंडपातून उचलून आपल्या घोड्यावर घेऊन पळत आहे. त्याची आई राधा त्याला थांबण्याचा प्रयत्न करते आणि गोळी मारण्याची धमकीदेखील देते. मात्र, बिरजू थांबत नाही, त्याला वाटते की मला सर्वात जास्त प्रेम करणारी आई मला गोळी मारू शकत नाही. मात्र, चरित्रसंपन्न असणारी आई आपल्या गावातील मुलीला पळवणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला गोळी मारते. चित्रपटातील हे दृश्य शूटिंगच्या शेवटी चित्रित करण्यात आले होते. हा चित्रपट 1957 मध्ये प्रदर्शित झाला होता.

आक्रोशाने भरलेल्या या विद्रोही पात्राची भूमिका दिलीप कुमारांनी करावी, अशी मेहबूब खानची इच्छा होती. मात्र, दिलीप कुमारने नर्गिससोबबत काही प्रेमकथा असलेले चित्रपट केले होते, त्यामुळे ते नर्गिसच्या मुलाची भूमिका करू इच्छित नव्हते, पण ही भूमिका त्यांच्या मनात इतकी बसली होती की, त्यांनी ‘गंगा जमना’ मध्ये बिरजूसारखीच भूमिका करून आपली इच्छा पूर्ण केली. या चित्रपटातील नायकाचादेखील गावातील सावकाराविरुद्ध आक्रोश असतो. अती झाल्यावर तो डाकू बनतो. यात क्लायमॅक्समध्ये त्याचा इन्स्पेक्टर भाऊ त्याला गोळी मारतो. अन्यायाविरुद्ध आक्रोशाने भरलेला हाच बिरजू साधारणत: दोन दशकानंतर सलीम-जावेद यांच्या ‘दीवार’ मध्ये आला. मात्र, महानगरात तो घोडेस्वार नाही, तर तस्कर आहे.

भारतीय सिनेमातील तीन महान चित्रपटांतील नायकांचे पात्र बिरजूसारखे आहेत. बिरजूमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती इतकी होती की सुनील दत्त, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना आपले सर्वश्रेष्ठ चित्रपट देण्यासाठी प्रेरित केले. बिरजूच्या जीवनातील मुख्य भाव म्हणजे तो आपल्या आईवर खूप प्रेम करतो आणि त्याला अन्याय सहन होत नाही. तो रागीट असतो. खरं तर तो एक निरागस मात्र दु:खी व्यक्ती आहे. बिरजूची आई आपल्या सोन्याच्या बांगड्या सावकराकडे गहाण ठेवते, त्याचे व्याज म्हणून तो तिचे तीन चतुर्थांश पीक घेऊन जातो. मात्र, मूळ पैसा तिथल्या तिथच राहतो. भारतीय सिनेमाचा पहिला खलनायक व्याज खाणारा सावकर होता, दुसरा तस्कर आणि तिसरा आतंकवादी आहे. नायकापेक्षा जास्त बदल खलनायकांच्या रूपांत झाला आहे.

असो, संजय दत्तचा जन्म 29 जुलै 1959 मध्ये झाला आहे. ‘मदर इंडिया’च्या वेळी त्याची आई गरोदर होती. नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या मनात बिरजू होता. मात्र, आपण संजय दत्तला बिरजू म्हणू शकत नाही. त्यांचा हा आक्रोश सामाजिक कारणामुळे नव्हता तथापि, त्यांचे पालनपोषण अगदी लाडात झाले आहे. त्यांनी कधी व्याज खाणारा सावकर पाहिला नाही. मात्र, तस्करप्रमुखांसोबत त्यांचे संबंध होते, असे माध्यमांत अनेकदा जाहीर झाले आहे. त्यांच्याकडे मिळालेली एके 56 रायफल मुंबई बॉम्बस्फोटासाठी आणण्यात आलेल्या शस्त्रामधीलच एक होती. जिला नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. काही लोकांना संशय आहे की, या शस्त्राची त्यांना माहिती होती. मात्र, टाडा न्यायालयाने त्यांना माहीत नसल्याचे म्हटले.

सुनील दत्त आणि नर्गिस आपल्या देशावर प्रेम करत होते आणि त्यांच्या कार्यपद्धतीत आदर्श होता. मात्र, संजय दत्त लहानपणापासून जिद्दी होते आणि अकारण आक्रोश करत होते. त्यांच्या आचरणाची तर्कपूर्ण व्याख्या करणे शक्य नाही. आईवर जीवापाड प्रेम करणार्‍या संजयला ती कँसरग्रस्त होताच अमली पदार्थ एलएसडी घेण्याची सवय जडली. हे व्यसन सोडण्यासाठी सुनील दत्तने विदेशात जाऊन त्यांचा उपचार केला होता. एकेकाळी खूप जिद्दी असल्याचे त्यांनी स्वीकार केले आहे. सुनील दत्त आणि नर्गिस एका राजकीय आदर्शाशी जोडलेले होते, पण संजय दत्त अमरसिंह यांच्या सांगण्यावरून समाजावादी झाले होते आणि तितक्या लवकर राजकारण सोडूनही दिले. ते प्रत्येक क्षेत्रात अधीर आणि अस्थिर राहिले आहेत.

शकील नुरानी यांचा ‘जान की बाजी’ त्यांच्यामुळे पाच रिल बनल्यानंतर बंद झाला होता. न्यायालयीन आदेशानंतर संजयने उशिरा पैसे परत केले. निर्माता जवाहरलाल बाफनानेसुद्धा संजय अभिनीत रद्द झालेल्या चित्रपटात पैसे गमावले. निर्माता अमित चंद्राने संजय दत्तला ‘फतेह सिंह’ नावाच्या राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपटासाठी चांगला पैसा दिला होता, तो चित्रपट रद्द झाल्यावरसुद्धा परत देण्यात आला नाही. एकूनच संजय दत्तच्या आचरणातून फक्त गैरजबाबदार प्रतिमा समोर येते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवलेल्या त्यांच्या माहितीवर दु:ख वाटत नाही. तुम्ही बिरजूसाठी रडू शकता. मात्र, ज्याने अकारण आक्रोशाचे नाटक केले आहे त्याच्यासाठी संवेदना जागृत होत नाहीत. त्याला शिक्षा होणे आनंदाची गोष्ट नाही. मात्र, दु:ख वाटायचेही काही कारण नाही. त्यांच्या आग्रहावर ज्या मित्राने शस्त्र एका जागेवरून दुसर्‍या जागी पोहोचवले आणि ज्याने नष्ट केले, त्यांना शिक्षा झाल्यावर कोणीही काहीच म्हटले नाही.