आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूथ प्रवर झाबवाला यांना सलाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमाच्या बॉक्स ऑफिस यशाने निर्मात्यांचे प्रभावित होणे समजू शकतो, मात्र जनता आणि माध्यमांनादेखील त्या आकड्यांची चिंता होणे विचित्र आहे. कदाचित याच कारणामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी रूथ प्रवर झाबवालाच्या 85 व्या वर्षी झालेल्या मृत्यूकडे दुर्लक्ष केले. ई. एम. फास्टरच्या ‘रूम विथ ए व्यू’ आणि ‘हार्वर्ड्स एंड’ नावाच्या पुस्तकावर लिहिलेल्या पटकथांसाठी ऑस्कर मिळवणार्‍या रूथ प्रवर झाबवाला यांच्याकडे ऑस्करला सर्वोच्च सन्मान मानणार्‍यांनीदेखील दुर्लक्ष केले.

रूथ यांनी झाबवाला नावाच्या भारतीय पारसी आर्किटेक्टसोबत प्रेमविवाह केला होता. तीन दशकांपर्यंत त्या दिल्लीत राहिल्या. लंडनमध्ये ही प्रेमकथा सुरू झाली आणि 1951 मध्ये त्यांचे लग्न झाले. या दांपत्याच्या तीन मुली आहेत. न्यूयॉर्कमध्ये मृत्यूआधी त्यांनी आपल्या मुलीला आपल्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद आणि सुख पतीच असल्याचे सांगितले. त्यांचा अंत्यसंस्कार पारसी पद्धतीने झाला की ख्रिश्चन पद्धतीने झाला सांगणे अवघड आहे. मात्र हे खरे आहे की, भारताला समजण्याचा आणि ग्रहण करण्याचा त्यांनी निष्ठेने प्रयत्न केला. त्यांच्या डझनभर कादंबरीची थीम नेहमीच भारत असायची. ‘हिट अँड डस्ट’वर चित्रपटसुद्धा बनलेला आहे. कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला होता.

त्यांच्या मृत्यूने निश्चितच शशी कपूर यांचे डोळे भरून आले असतील. कारण त्यांचा पहिला चित्रपट इस्माईल मर्चंट आणि आयवरी यांचा ‘द हाऊस होल्डर’ रूथनेच लिहिला होता. इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयवरी यांच्या फिल्म कंपनीने डझनभर चित्रपट बनवले, तर सत्यजित रे यांच्या क्लासिक्सच्या निगेटिव्ह जपण्यासाठी मेहनतसुद्धा घेतली आणि पैसाही लावला. शशी कपूर आणि त्यांची पत्नी जॅनिफर या फिल्म कंपनीला आश्रय देत होते. रूथ यांनी साधारणत: दोन डझन पटकथा लिहिल्या. त्यांचा जन्म मध्य युरोपमध्ये झाला होता. इंग्लंडमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. भारत त्यांच्या सजृनप्रक्रियेचे केंद्र होते. त्यांच्या पात्रांचे हृदय नेहमी वेगवान संवेदनेने भरलेले राहायचे. प्रेम आणि भोजनासाठी ते नेहमी आतूर राहायचे. हे जॉटवाट्सने त्यांच्या आदरांजलीमध्ये लिहिले आहे. त्याच या लेखाच्या प्रेरणास्रोत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये त्यांना दफन केले असेल तर जमिनीच्या त्या भागात भारतासाठी प्रेमसुद्धा दफन झाले आहे. त्यामुळे बराक ओबामांच्या देशाचा तो छोटा भाग भारत आहे, ज्याप्रमाणे भारतात दफन काही इंग्रजांच्या मोहामुळे जमिनीचा तो भाग इंग्लंड आहे. बहादूर शाह जफरच दुर्दैवी होते, त्यांना ‘दो गज जमीन मिली कुंआ ए यार में’. विचारांना पुढे नेले तर पाकिस्तानच्या त्या भागाला ‘सुपूर्द-ए-खाक’ झाल्यामुळे भारत बनवून टाकले आहे.

चित्रपट लेखकांच्या पारंपरिक प्रतिमेपेक्षा वेगळ्या राहिलेल्या रूथ प्रवर झाबवाला यांनी दिल्लीत आपल्या घरीच बसून बहुतांश पटकथा लिहिल्या. त्या कधीच स्टुडिओमध्ये गेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीपासून नेहमी स्वत:ला दूरच ठेवले. जणू काही त्यांच्या लेखन टेबलावर रचलेला चित्रपट त्यांनी पूर्ण झाल्यावरच पाहिला. ज्या दिग्दर्शकांनी पटकथेला सृजन निष्ठेसोबतच चित्रित केले त्यांनी अशाच दिग्दर्शकासाठी पटकथा लिहिल्या. भारतीय व्यावसायिक सिनेमात पटकथेत नेहमी बदल होत असतात आणि कलाकार संपादन टेबलापर्यंत ढवळाढवळ करतात.

असो, रूथ प्रवर झाबवाला यांनी इंग्रजांच्या दृष्टिकोनातून भारताला पाहिले. म्हणजेच त्यांच्या निरीक्षणात एक निर्दयी तटस्थता होती. प्रेमाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तटस्थता येऊ शकत नाही आणि आकलन करण्यात चूक होऊ शकते. खरं तर तर्कापलीकडे फक्त महानतेचे गुणगाण करण्याला स्तुती म्हटले जाऊ शकते. मात्र हे सत्य चित्रण नाही. याबरोबरच तिरस्काराने पाहणेदेखील दोषपूर्ण आहे. खरं तर बहुतांश लेखक अतितिरस्कार आणि अतिप्रेमाने ग्रस्त असतात. कोणत्याही वस्तूला त्याची समग्रता पाहूनच अंदाज लावला जाऊ शकतो. प्रत्येक कथेत वेळ आपल्या संपूर्ण रूपात एक पात्र असते आणि तोच नायकदेखील असतो. वाचणार्‍यांचे पूर्वग्रह लिहिणार्‍यांपेक्षा जास्त बळकट असतात. तटस्थता अशक्य आदर्श आहे. एखाद्या राजकीय विचारधारेवर लेखकाचा विश्वास लेखनाला धार देतो. लेखन डुप्लिकेटिंग मशीन नाही आणि जशाच्या तसे ठेवण्याला सृजन म्हणता येत नाही.