आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द ग्रेट इंडियन पॉलिटिकल थिएटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सनडायल फिल्म कंपनीच्या ‘टिंग्या’चा प्रसिद्ध युवा लेखक, दिग्दर्शक मंगेश हाडवळेच्या ‘देख इंडियन सर्कस’च्या प्रदर्शनापूर्वी एक शो पाहायला मिळाला. तो अनुभव विलक्षण होता. भारतीय कथा चित्रपट आपल्या दुसर्‍या शतकाचा प्रवाससुद्धा सार्थकतेने पूर्ण करू शकतो, याचा आता विश्वास वाटतो. चित्रपटाच्या संवादातील एक वाक्य खरे ठरेल की, ‘रोने से रास्ता लंबा हो जाता है’, हा संवाद तितकाच संक्षिप्त पण अर्थपूर्ण आहे, जितका गणेश विसर्जनात गायले जाणारे ‘अगले बरस तू जल्दी आ’ चे गाणे. वर्ष सुखाने जावो असा याचा अर्थ आहे. खरं तर, भारतातील कोट्यवधी गरिबांनी हसून-गाऊनच जीवनाचा अवघड रास्ता सुखद बनवला आहे.

हा एक असामान्य चित्रपट आहे. यात एका गरीब कुटुंबाच्या दोन निरागस मुलांचे स्वप्न आणि त्यांच्या आई-वडिलांची भीती आहे. त्यामुळे या ओळी आठवतात ‘सिमटे तो दिले आशिक, फैले तो जमाना है, हम खाक नशीनो को ठोकर में जमाना है’ खरं तर अनेक अर्थपूर्ण टप्प्यांना मंगेशने खूपच सघनता आणि कमी खर्चात सादर केले आहे. मानवीय संवेदनेने भरलेला चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवतो आणि आतील लपलेला अर्थ आपल्या मनात प्रवेश करून जातो. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर आपण खूप काळ विचार करतो की, हाच आपला देश आणि समाज आहे का, ज्याच्या स्वातंत्र्यासाठी इतकी लांब लढाई लढण्यात आली. ग्रामीण भागात प्रतिमत दोनशे रुपयांची लाच खुलेआम दिली जाते, हे आपल्या लोकशाहीचे विकृत स्वरूप आहे.

हा चित्रपट अतिशय विलक्षण आणि मनोरंजकरीत्या एका कुटुंबाची कहाणी सांगत, आपल्या लोकाशाहीच्या मॉडेलसोबत आपल्या कथित विकासाच्या मॉडेलची दुरवस्था उघड करतो. हाच विकास सध्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या निवडणूक रथावर झेंड्याप्रमाणे फडकत आहे. हेच विदेशातून आयात केलेल्या विकासाचे मॉडेल आहे, ज्याने आर्थिक दरीला खोल केले आहे आणि गुन्हेगारी वाढवली आहे. महानगरातील उड्डाणपूल आणि उंच इमारतीने प्रभावित लोकांना जाणीव नाही की, गावात रस्त्याच्या निर्मितीचे नाटक दरवर्षी रचले जाते. मात्र, एक आई आपल्या चिमुकल्या मुलीला म्हणते की, तू रडू नकोस रस्ता लांब होईल.

संपूर्ण चित्रपटात डांबराचा एक रस्ता बनताना दाखवण्यात आला आहे. तथापि, गावात लोक धुळीत रस्ता शोधत आहेत. रस्त्याचा लंपट ठेकेदार एका मजुराला त्याच्या पत्नीला देण्यासाठी एक लिपस्टिक देतो आणि म्हणतो की, सातशे रुपयांची आहे, याचा हप्ता तुझ्या मजुरीतून कापून घेईल. मुक्या मजुराची पत्नी म्हणते की, अंगठा लावू नको, तुला सही करणे शिकवले आहे. तो आपल्या पत्नीच्या पोटावर लिपस्टिकने सही करतो, झोपलेली महिला ते पाहू शकत नाही म्हणून तो कागदावर त्याचे प्रिंट दाखवतो. या चित्रपटात पती-पत्नीचे प्रेम आणि दांपत्य जीवनाचे छोटी- छोटी दृश्ये आहेत. याला मेहनत करणार्‍यांचे प्रेमपत्र म्हणू शकतो. पूर्ण पोशाख घातलेली नायिका तनिस्था चॅटर्जीने सेंस्युअसनेसची लाट निर्माण केली आहे आणि नायक नवाजुद्दीन सिद्दिकीचे पूर्ण शरीरच रोमांचित होते. हा अभिनेता पूर्ण शरीराद्वारे भाव व्यक्त करतो. भुकेने आकसलेल्या पोटावर अमेरिकेतून आयात एका लिपस्टिकने एक अशिक्षित सही करतो. हेच आपल्या नकारात्मक आधुनिकता आणि विकासाच्या मॉडेलचे सत्य आहे.

खरं तर हा चित्रपट म्हणजे भारताच्या राजकीय व्यवस्थेच्या सर्कसची कथा आहे. प्राणी आणि माणसाची कसरत दाखवणारी सर्कस तर फक्त एक रूपक आहे. या सर्कसमधील एक ठेंगणा जोकर जेव्हा पगार मागतो तेव्हा त्याला लाथ मारली जाते. त्याच्या पाठीवर चिकटलेली 20 रुपयांची नोट एक मुलगा गोंधळात पळवतो. संपूर्ण देशात तमाशा सुरू आहे. गरिबामध्ये जर धाडस असेल तर ऐन गोंधळात जाऊन आपला हक्क घेऊ शकतात. हा चित्रपट मलिक मोहंमद जायसी यांचे महाकाव्य ‘पद्मावत’ प्रमाणे उदाहरणांनी भरलेली आहे.

सर्कसमध्ये तीन जोकर एका खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अयशस्वी होतात, कारण प्रत्येक प्रयत्नात खुर्चीची उंची वाढत जाते. शेवटी ते तिघे स्पर्धक एकावर एक चढून खुर्चीवर बसतात. खुर्चीवर पंतप्रधान लिहिलेले असते. वर बसलेला बुटका आपले बूट आणि मोजे काढून फेकतो. सत्तेच्या शर्यतीतील रनर ते लुटतात.

चित्रपटातील लहान मुलांच्या आईला तिचे वडील इच्छा असूनही सर्कस दाखवू शकले नव्हते. चित्रपटाच्या शेवटी सर्कसचे तिकीट हवेत उडते. ते निवडणूक प्रचार रॅलीच्यावर उडत असते. सर्कसचे हे तिकीट निवडणुकीचे तिकीटदेखील असू शकते. खरं तर लेखक, दिग्दर्शकाचे मन कळणे अवघड आहे. मंगेश पहिला शेतकर्‍याचा मुलगा आहे, ज्याने कॅमेर्‍याचा नांगराप्रमाणे वापर केला आहे.