आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतारवयात आठवणींचा आधार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला जुना मित्र शाहरुख खानवर सध्या जुही मेहता (चावला) नाराज आहे. तिचा भाऊ बॉबी चावला शाहरुखच्या निर्मिती संस्थेत मुख्य अधिकारी होता. शाहरुखच्या पहिल्या चित्रपटापासून ते ‘पहेली’ पर्यंत त्याने काम पाहिले. दुर्दैवाने तो आजारी पडला आणि बर्‍याच काळापासून कोमाच्या अवस्थेत रुग्णालयात आहे. शाहरुख खानने त्याच्या उपचारावर पैसा खर्च केल्याचे आणि आजही करत असल्याचे कळते. जुही स्वत: आपल्या भावाचा उपचार करण्यात सर्मथ आहे. शाहरुखने काही दिवसांपूर्वीच बॉबीच्या जागी दुसर्‍या व्यक्तीची नियुक्ती केली. याविषयी शाहरुखने जुहीला सांगितले नाही. मात्र, कार्यभार सांभाळणार्‍या व्यक्तीने जुहीला याची माहिती दिली. शाहरुख खान व्यग्र नायक असल्याबरोबरच एका मोठय़ा व्यवसायाचे व्यवस्थापनदेखील करतो. तो आपल्या मोठय़ा होत असलेल्या मुलांनादेखील वेळ देतो. त्यामुळे त्याच्याकडे आता जुही चावला आणि अजीज मिर्झाला भेटण्यासाठी वेळ नाही. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात इतका व्यग्र आहे की सामाजिक औपचारिकतेसाठी त्याच्याकडे वेळ नाही.

जुहीला कदाचित जुन्या दिवसाची आठवण येत असेल, जेव्हा अजीज मिर्झा यांनी ‘राजू बन गया जेंटलमॅन’मध्ये संघर्षरत युवा शाहरुख खानला नायकाच्या भूमिकेत घेतले आणि नायिकेच्या भूमिकेसाठी स्थापित नायिका जुही चावलाकडे प्रस्ताव घेऊन आले आणि तिने तो सहज स्वीकार केला. एका प्रकारे हे शाहरुखवर तिचे उपकार होते. याच्या काही वर्षांनंतर शिखरावर पोहोचताच शाहरुखने अजीज मिर्झा आणि जुहीसोबत चित्रपट निर्मिती संस्था उघडली. त्यांचा पहिला चित्रपट ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ होता. ‘राजू बन गया जेंटलमॅन’ राज कपूरच्या ‘श्री 420’वर आधारित होता. नव्या कंपनीच्या पहिल्या चित्रपटाचे नावदेखील त्याच चित्रपटातील शीर्षक गीतावर आधारित आहे.

शाहरुख खान, जुही आणि अजीज मिर्झाने दीर्घकाळ काम केले. मात्र, एका वळणावर सोबत काम करणे बंद केले. मात्र, त्यांच्यात कटुता नव्हती. जुही चावला आजही शाहरुखच्या क्रिकेट व्यवसायात भागीदार आहे. जीवनाच्या यात्रेत भेटणे-विभक्त होणे सगळे काही स्वाभाविक असते. मात्र, उतारवयात लोक जास्त भावुक होतात. थोडे दुर्लक्ष करणेदेखील त्यांना सहन होत नाही. जुहीने दीर्घकाळ यशस्वीरीत्या काम केले, आजही ती चांगल्याप्रकारे काम करत आहे. ‘गुलाबी गँग’मध्ये माधुरी मुख्य भूमिकेत आहे आणि जुही नकारात्मक भूमिकेत आहे. जुही आपल्या कामात यशस्वी आहे. तिचा मुलगा आणि मुलगी किशोरवयीन आहेत.

खरं तर, रोज भेटणे चांगल्या मैत्रीचा पुरावा नसतो आणि दीर्घकाळ न भेटणे मैत्री तुटण्याच संकेत नसते, लग्न प्रेमाचा पुरावा नसतो आणि दीर्घकाळ विभक्त होण्याला नात्याचे तुटणे म्हणता येत नसते. कारण, दिसणार्‍या वास्तविक जगासोबत प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक संपूर्ण जग बसलेले असते. तुम्ही एका जागी उपस्थित राहून दुसर्‍या जागी अदृश्य होऊ शकता. अजीज मिर्झाने चित्रपट बनवणे बंद केले आणि ते सध्या गोव्यात वेळ घालवतात. एका जमान्यात त्यांच्या बँड स्टँडवरील छोट्या फ्लॅटमध्ये युवा संघर्षरत लोकांची टोळी जमायची. ते फ्लॅट ‘नुक्कड’ मालिकेप्रमाणे होते. त्याची निर्मिती कुंदन शहा आणि अजीज मिर्झा यांनी केली होती. याच जागी अनेक पटकथा बनल्या, अनेक तरुणांनी स्वप्न पाहिली. आज शाहरुख खानची भव्य हवेली ‘मन्नत’ याच ‘नुक्कड’च्या जवळ आहे. येता-जाता शाहरुखला त्याची आठवण होतच असेल. मात्र, जीवनाचा वेग थोडा वेळ थांबण्यासाठी परवानगी देत नाही. 24 तास भावना व्यक्त करणे शक्य नसते. अनेकदा त्याची अति करणे अश्लीलतादेखील ठरू शकते.

असो, 29 एप्रिल रोजी आमिर खान आपल्या पहिला यशस्वी चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ च्या प्रदर्शनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पार्टी देत आहे. त्यात नायिका जुही चावलादेखील आमंत्रित आहे. कदाचित दिग्दर्शक मन्सूर खानदेखील उपस्थित राहतील. सगळेच नाते ‘कयामत से कयामत तक’ याची कल्पना जुहीला असायला हवी. मात्र, आयुष्याच्या ज्या वळणावर ते जडले होते तो टप्पा कधी उद्ध्वस्त होत नाही.