आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अजीब दास्तां है ये, कहां शुरू कहां खतम’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिने शताब्दी महोत्सवानिमित्त चार दिग्दर्शकांनी अर्ध्या-अर्ध्या तासाच्या चार लघु चित्रपटांना ‘बॉम्बे टॉकीज’च्या नावाने प्रदर्शित केले. करण जोहरच्या चित्रपटात तरुण नायक वादाळाप्रमाणे आपल्या घरात घुसतो आणि आपल्या वडिलांना म्हणतो की, ‘तो तृतीयपंथी नाही, गे आहे, तृतीयपंथी होणे वाईट नाही आणि गे होणेदेखील वाईट नाही’. हे वक्तव्य समलैंगिकतेला बळ देणारे आहे. दुसर्‍या कुटुंबात 22 वर्षांपासून विवाहित रणदीप हुडा एका चॅनलचा लोकप्रिय न्यूजरीडर असतो. त्याची पत्नी राणी मुखर्जी एका वर्तमानपत्रात मनोरंजन पुरवणीची संपादक असते. तिचा सहायक म्हणून त्या तरुणाला नोकरी लागते. तो आपली ओळख सांगताना स्वत: गे असल्याचे सांगतो. संपूर्ण चित्रपटात तो आपल्या गे असण्याची माहिती खणखणीत स्वरात देत असतो. तो बॉस राणीकडून तिच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यात इच्छुक असतो. गेल्या शंभर वर्षांत अशा प्रकारचे पात्र आणि अशी चर्चा चित्रपटात तुम्ही कधी ऐकली नसेल. मात्र आगामी शंभर वर्षांत असे होणार आहे. याचा होमियोपॅथिक डोस देणे करण जोहरने खूप आधीपासूनच सुरू केले आहे. त्याच्या मागील चित्रपटात कॉलेजचा प्राचार्यसुद्धा मरेपर्यंत आपल्या समलैगिंकतेच्या अपूर्ण इच्छेचे दु:ख व्यक्त करत असतो.