आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बॉलिवूडमधील 'कपूर'नामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळजवळ दहा कोटींमध्ये बनलेल्या ‘आशिकी 2’ ने 70 कोटींची कमाई केली आहे. पन्नास कोटींमध्ये बनलेले चित्रपट, जे शंभर कोटींची कमाई करतात, त्यांच्यापेक्षाही ‘आशिकी 2’ खर्चांच्या प्रमाणात जास्त नफा मिळवून देणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्घा कपूरची जोडी लोकांना खूप आवडली. या चित्रपटाचे संगीत कर्णप्रिय असूनही ‘आशिकी’च्या संगीतासारखी मजल मारू शकले नाही. त्यामुळे यशाचे श्रेय महेश भट्ट, लेखिका शगुप्ता रफीक, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरला जाते. एका प्रकारे हा वेगवेगळ्या प्रकारच्या कपूरांचा काळ आहे.

ज्यात आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर यशस्वी होत आहेत. तथापि शाहिद कपूर नवीन शैलीचा शोध घेत आहेत. याबरोबरच कुणाल रॉय कपूरसुद्धा चरित्र भूमिकेत चमकत आहेत. ते यूटीव्ही कॉर्पोरेटचे उच्च अधिकारी सिद्धार्थ रॉय कपूरचे सख्खे भाऊ आहेत. आदित्य, कुणाल आणि या कंपनीने अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’ चे जगभरातील वितरण अधिकार विकत घेतले आहेत. त्यामुळे एका नव्या प्रकारचे कपूर घराणे मनोरंजन जगतात धूम करत आहे. सिद्धार्थ कपूरने विद्या बालनसोबत लग्न केले आहे, त्यामुळे आता विद्यासुद्धा कपूर झाली आहे.