आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनारसची गंगा आणि दिल्लीची यमुना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच दिवसांनंतर एक चांगली प्रेमकथा पडद्यावर पाहायला मिळाली. आजकाल चित्रपट मंडीत वरवरच्या प्रेमकथा बनत आहेत. सध्या चित्रपट उद्योगात इम्तियाज अलीला प्रेमकथांचा गुरू मानले जात आहे. त्याचा चेला अयान मुखर्जीचेसुद्धा खूप नाव होत आहे. मात्र या दोघांना ‘रांझणा’च्या आनंद एल. रॉय आणि हिमांशू शर्माकडून काही शिकले पाहिजे.

‘रॉकस्टार’नंतर हिमांशू शर्मा आणि आनंद रॉय यांनी प्रेमात त्यागाचे महत्त्व स्थापित करण्यासाठी ‘रांझणा’ची प्रेमकथा लिहिली. या चित्रपटातील हीर बनारसमध्ये राहणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मुलगी जोया आहे आणि रांझा ब्राम्हण पुजार्‍याचा मुलगा आहे. हीर-रांझामध्ये कुटुंबाची शत्रूता होती, यात धर्माचे अंतर आहे. हीर-रांझामध्ये कच्चे मडके असल्याची जाणीव हीरला असते तरीसुद्धा ती त्याच्या सहारे नदी पार करते. ‘रांझणा’मध्ये नायकाला माहीत असते की, समोर मृत्यू आहे तरीसुद्धा तो तारकाची इच्छा असते म्हणून जातो.