आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रांझणा’चे यश आणि धनुष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंद रायच्या ‘रांझणा’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत चांगली कमाई केली. त्यामुळे कमी बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट यशस्वी ठरला. ‘तनू वेड्स मनू’नंतर आनंद रायचे हे दुसरे यश आहे. त्यांचे कुटुंब देशाच्या फाळणीवेळी सिंधहून दिल्लीत आले. मात्र त्यांनी दक्षिणेत काम सुरू केले. ‘तनू वेड्स मनू’चा नायक आर. माधवनप्रमाणेच नवीन चित्रपटाचा नायक धनुषदेखील दक्षिणेचाच आहे. तो सुपरस्टार रजनीकांतचा जावईसुद्धा आहे. आनंद रायने औरंगाबादमध्ये कॉम्प्युटर विज्ञानाचे शिक्षण अर्धवट सोडून भाऊ रवी रायसोबत मालिका बनवणे सुरू केले. मालिका सोडल्यानंतर त्यांना खूप संघर्ष करावा लागला.