आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story By Jayprakash Choukase On 2d, 3d, 4d, 5d Cinema

मनात चित्रपट आणि चित्रपटात चेतना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या अनेक मल्टिप्लेक्समध्ये 2 डी, 3 डी, 4 डी, 5 डी पद्धतीचे चित्रपट वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये दाखवले जात आहेत. काही लोक चारही तंत्रज्ञानात चित्रपट पाहतात आणि त्यातील बदल, प्रभावाचा आनंद घेतात. भारतीय प्रेक्षक एकल चित्रपटगृहात, मल्टिप्लेक्समध्ये 2 डी आणि 3 डी चित्रपट पाहतात. मुंबईच्या वडाळामध्ये आयमॅक्स चित्रपटघरात 'द डार्क नाइट राइजेस'चे आतापर्यंत सर्वच शो फुल सुरू आहेत. मात्र, इतर ठिकाणी प्रेक्षक संख्या ठिकठाक आहे. तिकीट खिडकीवर हे अंतर चित्रपटाच्या परिणामामुळे आहे. कथा तीच आहे, पण तंत्रज्ञान वेगवेगळे आहे. तथापि आपली चित्रपटगृहे बाल्यावस्थेत आहेत.
5डी चित्रपटगृहात प्रेक्षकांची खुर्ची चित्रपटाशी जोडलेली असते. म्हणजेच नायक गाडीला उजव्या हाताकडे फिरवत असेल तर सीटदेखील त्याचदिशेने थोडे फिरताना जाणवेल. नायकाने ब्रेक लावताच आपणही त्याच गाडीत बसलेलो आहोत असे प्रेक्षकाला वाटते. एकुणच काय तर प्रेक्षक कथानकाचा भाग झाला आहे. त्याला पात्राचा अनुभव किंवा अभिनय समजण्याची संधी मिळत आहे. वेगाने बदलणार्‍या मनोरंजन दृश्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचे आभार मानले पाहिजेत, पण अंत्ययात्रेत सामील होण्याच्या वेदनेतून प्रेक्षक वाचू शकत नाही. जणूकाही न मरताच तंत्रज्ञानाने 'स्वर्गा'च्या अनुभवाचा ट्रेलर किंवा 'प्रोमो' तयार केला आहे. संवेदना बोथट होण्याच्या कालखंडात अशा प्रकारचे चित्रपट मनात खोलवर रुतण्याचे काम करतात.
मनोरंजन तंत्रज्ञान सध्या एबीसी पासून 'डी'पर्यंत पोहोचले आहे आणि त्यावर त्याची सुई अडकली आहे. रुंदी, लांबी आणि खोलीच्या परिमाणापलीकडे जाऊन तो आता मनावर प्रभाव पडण्याची चिप लावू इच्छित आहे. भारतात लवकरच 5डीची सुविधा देणारे चित्रपटगृह उघडणार आहेत. मनोरंजनाचे प्रभाव आता पसरत आहेत. समाज शांत असेल तर चित्रपट चालतात, असंतोष असेल तर आणखीनच चालतात आणि अराजक असेल तर विक्रम मोडतात.
खरं तर समाजाला काही तरी चटपटीत मसाला हवा असतो. काही नेते आणि बाबादेखील अधूनमधून मसालेदार कृत्ये करत असतात. जनतेला मार्गदर्शन करण्याच्या व्यापारात दारू, मनोरंजन आणि वेश्यावृत्तीची काही तत्त्वे सामील असतात. टॉम क्रूजच्या एका 'प्रायमल फीअर' चित्रपटाच्या पहिल्या भागात तो एका शोध पत्रकाराला सल्ला देतो की, वेश्यालयात तुला सत्य मिळेल आणि प्रेमानंद राजकारणात मिळेल. कुठे नेताजींच्या डीएनएमुळे तो कुणाचा वडील सिद्ध झाला आहे, तर कुठे नेताजींच्या 'पत्नी'ने त्याच्या स्वार्थामुळे आत्महत्या केली आहे. एका नेताजीच्या मैत्रिणीने दुसरीचा खून केला आहे.
राजकीय 'शक्ती' विविध प्रकाराने व्यक्त होत असते. 5डी कला पाहून मला एक घटना आठवते. रशियामध्ये लुमियर बंधूंनी केलेल्या चित्रपट प्रीमियर वेळी महान लेखक मॅक्झिम गोर्की उपस्थित होते. त्यांनी आपल्या रोज प्रकाशित होणार्‍या कॉलममध्ये लिहिले होते की, 'काल मी चित्रांच्या अद्भुत जगात होतो. या चित्रांचा प्रभाव विलक्षण होता. यामुळे मनावर झालेल्या परिणामांची स्पष्ट व्याख्या करणे अशक्य आहे. पाण्याचे दृश्य येताच ते पाणी सरळ प्रेक्षकांच्या तोंडावर येईल आणि त्या विचाराने तो मागे सरकेल. तुम्ही कुठे बसलेले आहात याचे तुम्हाला भान राहत नाही. अद्भुत कल्पना आपल्या डोक्यात प्रवेश करतात.'
मॅक्झिम गोर्की यांनी 1896 मध्येच चित्रपटातील शक्यता आणि विविध परिणामांची भविष्यवाणी केली होती. सृजनशील व्यक्ती काळाच्या क्रिस्टल ग्लासमध्ये भूत आणि भविष्याचा अभ्यास करत असतो. त्यामुळेच तो वर्तमानात अमर कलाकृती तयार करतो. असो. जीवनात प्लास्टिक घर करत आहे. सकाळी बाहेर फिरण्याऐवजी लोक स्टिमुलेटर मशीनवर चालतात.
'रोशन' रौप्यमहोत्सव
ऋतिक रोशन देतोय 'क्वाड्रोब्लेजिक'च्या रुग्णाना नवजीवन
घर सोडून दुस-याच ठिकाणी राहातोय ऋतिक रोशन !
कमी वयात ऋतिक रोशन झाला अरबपती