आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story By Jaypraksh Choukase On Satymev Jayate Last Episode

उम्मीद अभी बाकी है !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' चा शेवटचा भाग 29 जुलै रोजी सादर करण्यात आला. याबरोबरच भारतीय टीव्हीवरील सामाजिक बांधिलकीचा शंखनाद करणार्‍या कार्यक्रमाचा शेवट झाला. गेल्या तीन महिन्यांपासून रुग्ण समाजाची खुली शस्त्रक्रिया दाखवली जात होती. त्यातील सांडणार्‍या रक्ताला पाहून देश थक्क झाला होता. रुग्ण मेला नसून अजूनही त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे शेवटच्या भागातून कळले. या घोर नैराश्यातदेखील अंधश्रद्धा आणि कुप्रथांच्या डोंगरावर चिमुकल्या हातांनी प्रहार केला जात आहे आणि त्यामुळेच आपण एक दिवस निश्चित यशस्वी होऊ शकतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमिर खानने तेथे उपस्थित असलेल्या मुलांना त्यांच्या स्वप्नातील भारताविषयी विचारले असता मुलांना धर्म आणि जातिभेद मुक्त भारत हवाय तर कुणाला भ्रष्टाचारमुक्त, तर कोणाला स्वच्छ आणि हरितक्रांती भारत हवा आहे. भावी नागरिकांच्या मनाचा विश्वास एका देशाची ताकद असते. वर्तमान भारत गांधी आणि नेहरूंच्या स्वप्नांतील भारत तर बनलाच नाही, शिवाय सरदार पटेल आणि मौलाना अब्दुल कलाम यांना वर्तमान भारताच्या परिणामाची भीती नाही. समानता, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता आपले आदर्श मूल्ये आहेत आणि न्यायाधारित समतावादी समाजाची रचना करण्याचा निश्चय केला पाहिजे, असे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेत बनलेल्या कमिटीने घटनेच्या पहिल्या पानावर नमूद केले होते; पण अनेक कारणांमुळे घटनेत नमुद असलेल्या या गोष्टीचे पालन झाले नाही आणि आपण सर्वांनीच एका खराब व्यवस्थेची रचना केली. स्वप्न अजून मेलेले नाही, असा विश्वास आमिर खानला आहे. देशात अनेक ठिकाणी होत असलेल्या चांगल्या कामाची माहिती आमिरने या कार्यक्रमातून दिली. या बिगर सरकारी प्रयत्नांमुळेच आजारी असलेल्या भारताची निरोगी होण्याची कल्पना केली जाऊ शकते. कच्छमध्ये 2001 ला भूकंप आला आणि गुजरातमध्ये 2002 ला जातिवाद पेटला होता. सुरतच्या सवरेदय ट्रस्टने या दोन्ही घटनांत अनाथ झालेल्यांचे पालनपोषण केले. अरविंद, परिमल, तृप्ती आणि सुशीला बहन यांनी आपल्या अनेक मित्रांच्या मदतीने जखमींची सेवा केली. जातिवाद मानणार्‍या सुशीलाने नईम नावाच्या मुलाच्या हातून लाडू खाल्ला आणि मानवतेपेक्षा मोठा कोणताच धर्म नाही या दिव्य इशार्‍याला अनुभवले. काश्मीरमध्ये अनेक पंडित कुटुंबांना आपल्या वडिलोपार्जित जमिनी सोडून पळावे लागले होते. अशाच एका हिंदू कुटुंबाला तेथील मुस्लिम कुटुंबांनी थांबवले आणि त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले. त्यांनी निवडणुकीत त्या हिंदू महिलेला निवडून दिले आणि आता तीच त्या मुस्लिम समाजाची कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुनीता नावाच्या महिलेने 'प्रज्वला' नावाची संस्था सुरू केली आहे. ही संस्था वेश्यावृत्ती व्यवसायात लुप्त असलेल्या महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीमधील संजीव चौधरी एकदा बिहारमधील आपल्या गावी गेले असता त्यांना भयंकर जातिवाद दिसून आला आणि त्याच्या निर्मूलनासाठी त्यांनी आपल्या सुविधासंपन्न जीवनाचा त्याग केला. डोम मुडदे वाहतात; पण त्यांना गंगेत आंघोळ करण्याची परवानगी नाही. कोल्हापूरमध्ये नसीमा हिने 'हेल्पर ऑफ हँडिकेप' नावाची संस्था उघडली आहे आणि तिला बाबू काका दिवान यांनी मदत केली. या संस्थेने 18 हजार अपंग लोकांना समानतेचा अधिकार देण्यात यश मिळवले आहे. विप्रोचे मालक अजीम प्रेमजी यांनी आठ हजार कोटी दान देऊन एक ट्रस्ट उभा केला आहे. फैजाबादमधील मोहंमद शरीफ बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार त्या-त्या धर्मानुसार करताहेत. झारखंडमधील प्रामाणिक अधिकारी सत्येंद्र दुबे यांना गोळी मारण्यात आली. त्यांच्या आठवणीत त्यांचे वडील भ्रष्ट व्यवस्थेशी लढत आहेत. खरं तर ज्या मुद्दय़ांसाठी महात्मा गांधींनी संघर्ष केला त्याच मुद्यांना आमिर खानने मांडले. गांधीजींनी अनिष्ट प्रथांविरुद्ध लढाईला स्वातंत्र्य संग्रामाचा भाग बनवले होते. देशात विविध भागांत सुरू असलेल्या या बिगर सरकारी प्रयत्नांमुळेच आशा जागृत होत आहे. आमिर खानचे अभिनंदन.
तहानलेल्या नद्या
AAMIR SPL : 'सत्यमेव जयते'नंतर आमिरला व्हायचे आहे रिलॅक्स !
सत्यमेव जयते : आजच्या भागात आमिरने उठविला पाण्याचा मुद्दा