आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feature Story By Jaypraksha Choukase On Actress Life

सिनेतारकांच्या सुख-दु:खांच्या कथा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुर भांडारकर यांच्या करिना कपूर अभिनीत 'हिरॉईन'चा प्रोमो टीव्हीवर दाखविला जात आहे. अश्लील चित्रपट करणार्‍या खालच्या स्तरातील महिलेच्या खर्‍या कथेवर 'द डर्टी पिक्चर'आधारित होता. पण 'हिरॉईन' एका सुपर नायिकेची काल्पनिक कथा आहे. आजकाल सर्वच आघाडीच्या नायिका आयटम साँग करत आहेत. त्यामुळे राखी सावंत किंवा मल्लिका शेरावतला संधी मिळत नाही. अंगप्रदर्शन आता 'बी' आणि 'सी' ग्रेड चित्रपटांच्या नायिकेपर्यंतच मर्यादित राहिलेले नाही. करीना, कतरिना, दीपिका अतिशय तोकड्या पोशाखात किंवा पोशाखाच्या कमतरतेत सारख्याच दिसत आहेत. हा 'दमडी (पैसा) दो, चमडी देखो'चा काळ आहे. दुसरीकडे नेत्यांचेदेखील कपडे उतरवले जात आहेत. समाजाच्या कांद्याची सालदेखील उतरत आहे. ही उघड करण्याची वेळ आहे, पण सत्य अजूनही आपल्यापासून दूर आहे. भुकेने मरणार्‍यांची चिंता कुणालाच नाही. भुकेची मजबुरी आणि भुकेचे शस्त्र हाच सत्तेचा खेळ आहे. असो, सिनेतारकांच्या आयुष्यावर याआधीही अनेक चित्रपट बनलेले आहेत. मर्लिन मुन्रोच्या आयुष्यावर चित्रपट आलेला आहे. हंसा वाडकर यांच्या जीवनावर 'भूमिका' नावाचा चित्रपट श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटीलला घेऊन बनवला होता. एका सुंदर महत्त्वाकांक्षी मुलीच्या शोषणाच्या कथेची पुनरावृत्ती देखील झालेली आहे. मीना कुमारीचे आयुष्यदेखील चित्रपटासाठी कच्च्या मालासारखे आहे. सोहा अली खानसोबत सुधीर मिश्रा यांनी 'खोया खोया चांद' बनवलेला आहे. मधुर भांडारकर यांनी 'फॅशन'मध्ये महत्त्वाकांक्षा आणि शोषणाची कहाणी दाखविली होती. गुरुदत्त यांच्या 'कागज के फूल'मध्ये एका तरुणीच्या स्टार अभिनेत्री होण्याची कथादेखील आहे. प्रगती करणार्‍या महिलेला प्रत्येक क्षेत्रात 'शिकार' बनवण्याचा प्रयत्न केला जातो. हे सत्य चित्रपट उद्योगाची पार्श्वभूमीदेखील बदलू शकत नाही. या मुद्दय़ांवर महिलांची चर्चा व्हायला हवी. महानगरात ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिला दिवसभर वासनांध नजरा झेलत असतात आणि संध्याकाळी गच्च भरलेल्या रेल्वे आणि बसमधून अनेक अनोळखी मात्र सारखीच नियत असलेले स्पर्श झेलत घरी जातात. तिच्या निस्तेज शरीराला आराम कुठे असतो? असो, यशस्वी नायिकेला आता वेगळी भीती असते. ती बळजबरीच्या काळातून पुढे आलेली असते. आता तिच्यासोबत तिची सेना चालत असते. आता ती 'शिकार' करू शकते. करिअरच्या बुद्धिबळात कोणता प्यादा पुढे करायचा, कोणता काढून टाकायचा, या खेळात ती तरबेज झालेली असते. खरंतर आजच्या यशस्वी तारका एकल व्यक्ती उद्योगाप्रमाणे आहेत. त्या आपल्या आयुष्याला एखाद्या ब्रँडप्रमाणे संचालित करत असतात. त्या निरागस राहिलेल्या नाहीत. खरंतर आजच्या यशस्वी अभिनेत्री पुढे निरागसतेचा अभिनय करणे सर्वात मोठे आव्हान आहे. पडद्यावर प्रेमाचे दृश्य करून-करून त्यांच्या भावना बोथट झाल्या आहेत, ज्याप्रमाणे ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिलांच्या भावना होतात. आजच्या सर्वच आघाडीच्या तारकांची वार्षिक कमाई पन्नास कोटींपेक्षा कमी नाही आणि या समृद्धीमुळे त्यांच्यावर कोण खरे प्रेम करत असेल, हे सांगणे कठीण आहे. कायम सुंदर आणि सुदृढ राहणे सोपे काम नाही. गरीब महिलेप्रमाणेच ती कमी खाण्यास बाध्य असते. वजन करणारी मशीन त्यांच्या मनात नेहमी टिक्टिक् करत असते. करिना कपूरचा वैयक्तिक स्टॉफ परदेशवारीला कंटाळली आहे. संजय लीला भन्साळी यांना लग्न झालेली जुलियट पसंत नाही हा प्रचार खोटा आहे. त्यांना आपल्या चित्रपटासाठी नायिकेकडून 150 दिवसांचा वेळ हवा होता, पण करीनाजवळ फक्त शंभर दिवसांचा वेळ होता. असो, तारकांचे आरशाशी जवळचे नाते असते. प्रत्येक शॉटच्या आधी ती आरशात आपला मेकअप पाहते. तारुण्यातला हा मित्र वाढत्या वयात टिकाकार वाटतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो शत्रू वाटतो. सिनेतारका नेहमी आत्ममग्न आणि स्वत:वर प्रेम करणार्‍या नारसिष्ट असतात. नारसिष्ट नावाचा अतिशय सुंदर व्यक्ती स्वत:ला तलावात पाहून मंत्रमुग्ध झाला आणि त्यातच बुडून मरण पावला. तेव्हापासून नारसिष्ट शब्द प्रसिद्ध झाला. जेव्हा नायिकेला आरसा फुटलेला दिसतो तेव्हा तिच्या वेदना समजणे कठीण असते. 'हिरॉईन'च्या एका दृश्यात करीना घरगुती हिंसेची शिकार दाखवण्यात आली आहे. एका सुपरनायिकेने स्वत:ला मारहाण झाल्याचा प्रचार केला होता आणि त्याचा ठपका आपल्या निरागस प्रेमीवर ठेवला होता. मधुरने कदाचित याच घटनेचा उपयोग करून तिने केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतला आहे.

तहानलेल्या नद्या
AAMIR SPL : 'सत्यमेव जयते'नंतर आमिरला व्हायचे आहे रिलॅक्स !