आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणींच्या घड्यांचा खेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कोलोरेडो शहरात क्रिस्टोफर नोलनच्या 'द डॉर्क नाइट राइजेस' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका विक्षिप्त माणसाने पडद्यासमोर उभे राहून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 12 लोक मृत्युमुखी पडले, तर 58 लोक गंभीर जखमी झाले. या दु:खद घटनेनंतर निर्मात्याने चित्रपटाचे प्रीमियर रद्द केले. म्हणजेच कलाकार कार्यक्रमात गेले नाहीत, पण चित्रपटाचे प्रदर्शन सुरू ठेवले. त्या माणसाने विनाकारण असे कृत्य केले, त्याच्या डोक्यात 'केमिकल लोचा' झाला होता. चित्रपटाला त्याचा विरोध नव्हता. अमेरिका आणि कॅनडामध्ये चित्रपटाने 162 मिलियन डॉलरची कमाई केली, जी बॉक्स ऑफिस इतिहासात तिसर्‍या क्रमांकावर आहे.
वार्नर ब्रदर्स स्टुडिओचा 'गँगस्टर स्क्वॉड' चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यात एक दृश्य आहे, त्यात चित्रपटाच्या पडद्यासमोर उभे राहून एक माणूस गोळ्या झाडतो. कोलोरेडोच्या घटनेपूर्वीच या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले होते, तर पटकथा दोन वर्षापूर्वीच लिहिण्यात आली होती. हा फक्त योगायोग होता. चित्रपटातून हे दृश्य काढून टाकावे आणि त्याच्या जागी दुसरा पर्याय शोधावा की चित्रपटाचे प्रदर्शन काही महिन्यापर्यंत टाळावे किंवा प्रेक्षकांच्या मनावरील वास्तविक घटनेचा प्रभाव कमी झाल्यावर आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन करावे. असे प्रश्न वार्नरच्या अध्यक्षांना पडलेले आहेत. निर्माता सध्या अडचणीत आहे. चित्रपटातील हे दृश्य बदलल्याने चित्रपटाचा प्रभाव संपेल आणि दुसरीकडे हे दृश्य ठेवल्याने जास्त प्रेक्षक चित्रपट पहायला येतील, असे मत त्यांच्या एका तज्ज्ञाने मांडले आहे.
मनमोहन देसाई यांच्या अमिताभ बच्चन अभिनीत 'कुली'मध्ये अमिताभ यांच्या जखमी होण्याच्या फ्रेमला फ्रीज करण्यात आले होते. या शॉटच्यावेळी अमिताभ जखमी झाले असे पडद्यावर लिहिलेले असायचे. या दृश्यामुळेच 'कुली'ने चांगली कमाई केली. प्रेक्षकांची विचारशक्ती रहस्यमय असते. मुंबईत दशहतवादी हल्ले झालेल्या ठिकाणी पर्यटक जास्त संख्येत येतात. ज्या हॉटेलच्या भिंतीमध्ये गोळ्या घुसलेल्या आहेत त्या जागी लाकडाची फ्रेम करण्यात आली आहे. जणू काही एका पेंटिंगला फ्रेममध्ये उतरवण्यात आले आहे. पर्यटक या 'पेंटिंग्स'ला पाहण्यासाठी जास्त संख्येत येत आहेत त्यामुळे मला कुमार अंबुज यांच्या 'उजाड का सौंदर्य' कवितेची आठवण होते.
काही वर्षांपूर्वी ओनिडा टीव्हीची जाहिरात होती, 'ओनर्स प्राइड, नेबर्स अँन्वी' त्यातील साप तुटलेल्या टीव्हीवर येऊन बसतो. ही जाहिरात तिरस्कार निर्माण करणारी होती, पण ओनिडाची विक्री वाढवण्यात यशस्वी ठरली. माणसाचे मन अजब आहे. धर्मवीर भारती यांच्या 'प्रमथ्यु गाथा' ची आठवण झाली त्यात जनतेला ज्ञान देणार्‍या एक व्यक्तीला चौकात बांधण्यात येते. तेथे एक गिधाड त्या व्यक्तीचे हृदय खातो. त्याला रोज नवीन हृदय यायचे आणि ते गिधाड रोज त्याचे हृदय खायचे. आपले हृदय खाल्ल्याच्या वेदना त्याला व्हायच्या नाही, तर जनता हा प्रकार तमाशा समजून टाळ्या वाजवते याचे त्याला दु:ख व्हायचे.
लोकांच्या आवडी अजब असतात.

जेव्हा रामगोपाल वर्मा 'के सरा सरा' चित्रपट बनवत होते, तेव्हा त्यांच्या ऑफिसला अंधार्‍या गुहेचा आकार देण्यात आला होता आणि भिंतीवर विचित्र चित्र बनवण्यात आले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये जाताच त्यांच्या 'भूत' चित्रपटाच्या सेटवर आल्याचा भास व्हायचा. किशोर कुमारसारख्या गायकाला हॉरर चित्रपट पाहण्याचा छंद होता आणि त्यांच्याकडे शेकडो हॉरर चित्रपटाच्या व्हिडिओ कॅसेट्स होत्या. त्यांनी आपल्या विशेष शयनकक्षात भिंतीवर टीव्ही लावला होता आणि ते झोपून चित्रपट पाहायचे. हेच वैविध्य माणसाच्या जीवनाला रोमांचक बनवते. सगळे सारखेच असते तर आयुष्य निरस झाले असते. सगळ्यांचा एकच विचार असावा असा लष्करी पद्धतीचा विचार काही राजकारणी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. जणू काही ती माणसे नाहीत तर संख्या आहेत.
वार्नर ब्रदर्स यांचा 'गँगस्टर स्क्वॉड' आपल्या मूळ रूपातच प्रदर्शित करण्यात येईल आणि लोक पाहतीलसुद्धा असा अंदाज वर्तवला जात आहे. लोकांची स्मरणशक्ती कमी असते असे म्हटले जाते. लोक लवकर विसरतात. आयुष्यात अनेक दु:ख असतात त्यांना विसरूनच पुढे जावे लागते. आठवणींच्या घड्या घातलेल्या असतात आणि काही आठवणी आतील घड्यामध्ये नेहमीसाठी नमूद होतात. आठवणींना माणूस खेळाच्या पत्त्याप्रमाणे पिसूदेखीलशकतो. फाळणीसारख्या दु:खाची घडी घालून देश पुढे आला आहे. देशाच्या आठवणीचे चरित्रदेखील असेच असते. राजकीय पक्ष राष्ट्राच्या आठवणींच्या पत्त्यांना आपल्या सुविधेनुसार पिसतात. प्रत्येक देशात अनेक देशाचे लोक येऊन राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मूळ देशाची आठवणदेखील येते, पण वेळेनुसार ती आठवणीच्या खालच्या थरापर्यंत जाते. कोणत्याच देशात त्याच जमिनीतील लोक राहत नाहीत. आर्यदेखील भारतात बाहेरून आले होते, पण ते भारतीय आहेत. काहीच लोक ही सवलत घेतात, पण इतरांना देत नाहीत. मनोरंजन जगावर देशाच्या प्रवृत्तीचा प्रभाव पडतो.
PHOTOS : इथे ठेवा घरातील पैसा आणि आवक वाढवा
PHOTOS : ऑलिम्पिकच्या मंचावर दिसला मेडोनाचा जलवा
PHOTOS : पोर्न सिनेमा बघून एक्साईटेड होत असल्याचा सनीचा खुलासा
PHOTOS : फेसबुकवरील सर्वात चर्चित 10 फोटो