आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Feature Story On Chennai Express By Jaiprakash Choukase

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चेन्नई एक्स्प्रेस' : 141 मिनिटांचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकरोहित शेट्टीचा शाहरुख खान, दीपिका पदुकोन अभिनीत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ 141 मिनिटांचा मनोरंजक प्रवास आहे. ही गाडी कोणत्याही कंटाळवाण्या स्टेशनवर थांबत नाही. निर्मल आनंद देणार्‍या या चित्रपटात ‘विटी’ संवाद आहेत. विशेष म्हणजे हा कोणत्याही दाक्षिणात्य चित्रपटाची हिंदी आवृत्ती नाही. रोहितने काही वर्षांपूर्वी या चित्रपटाची कथा लिहिली होती.

प्रेसला सांगितल्याप्रमाणे शाहरुखने टायटलमध्ये आधी नायिकेचे नाव दिले आहे. चित्रपटाचा जीवदेखील दीपिकाच आहे. तामिळ भाषी युवतीच्या भूमिकेत तिने उत्कृष्ट काम केले आहे. आता ती सहअभिनेत्रीच्या खूप पुढे गेली आहे. यात काही नवल नाही की, शाहरुखने आपल्या आगामी चित्रपटासाठी तिच्याशी पुन्हा करार केला असावा.