आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लुटेरा’चा प्रचार आणि ‘मिल्स अँड बून’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चित्रपटांमध्ये नव्या कथा आणि डोंगराएवढय़ा जुन्या कथा नव्या पद्धतीने सादर करण्याचे प्रयत्न नेहमीच होत आले आहेत. मात्र, या दशकात ‘रंग दे बसंती’, ‘लगान’, ‘वेनस्डे’, ‘कहानी’, ‘विकी डोनर’, ‘पानसिंग तोमर’, ‘रांझणा’ इत्यादी चित्रपटांनी विलक्षण यश मिळवले आहे. ‘रांझणा’ची गंगोत्री रोमियो-ज्युलिएटपर्यंत जाऊ शकते, परंतु पटकथा आणि संवादात वेगळीच तरतरी आहे. निर्मिती क्षेत्रापेक्षा जास्त प्रचार क्षेत्रात अभिनव प्रयोग केले जातात. जे कलावंत फार तर 50 दिवसांचे सरासरी चित्रीकरण करतात ते एवढेच दिवस प्रचारासाठीसुद्धा लावतात.

विविध शहरांमधील मॉलमध्ये किंवा लोकप्रिय ठिकाणी अनोळखी समुदायाला संबोधित करणे, टीव्हीवरील प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची कसरत मोठय़ा निष्ठेने केली जाते. रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत ‘लुटेरा’च्या प्रचारासाठी जगातील पाच हजार ठिकाणांवरून विकल्या जाणार्‍या अत्यंत लोकप्रिय ‘मिल्स अँड बून’ या कादंबरीच्या तीन नव्या आवृत्त्यांच्या मुखपृष्ठावर रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचे छायाचित्र ‘लुटेरा’ नावासह प्रकाशित केले जाणार आहे आणि या कादंबर्‍यांचा कोणताच संबंध ‘लुटेरा’च्या कथेशी नाही. या तिन्ही कादंबर्‍या म्हणजे ‘मिल्स अँड बून’च्या परंपरेनुसार किशोरवयीन प्रेमकथा असतील. लोकप्रिय ब्रँड ‘मिल्स अँड बून’ गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय आहे आणि किशोर वयातील मुला-मुलींमध्ये तर खूप लोकप्रिय आहे.