आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मात्यांच्या आग्रहामुळे \'चाली\' चोरतो प्रीतम, तोडण्यात आले होते वडिलोपार्जित घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

42 वर्षांचे यशस्वी संगीतकार प्रीतम आज आपल्या ‘बर्फी’ आणि ‘ये जवानी है दीवानी’सारख्या यशानंतरदेखील दु:खी आहेत. कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी निर्मात्याच्या आग्रहामुळे देशी-विदेशी चालींची चोरी केली होती. त्या अपराधीपणाची भावना त्यांना आज चांगल्या काळाचा आनंद घेऊ देत नाही. त्यांचे वडील कोलकात्यात रेल्वेमध्ये होते आणि आई शाळेत शिक्षिका होती.

अत्यंत लहान घरात त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. पावसाळ्यात छतावरून पाणी पडायचे आणि त्यांना खाली भांडे ठेवावे लागत होते. पुणे चित्रपट संस्थेत संगीताचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांचे जीवन बदलले. त्यांनी दोन वर्षे संघर्ष केला. जाहिरातीसाठी जिंगल बनवले. पहिल्या यशानंतर आपले जुने घर पाहण्यासाठी ते कोलकात्याला गेले होते. मॉल बनवण्यासाठी ते तोडण्यात आले होते. पावसाळ्यात छतावरून पाणी गळणार्‍या त्या घराची आठवण त्यांच्या मनात घर करून गेली. त्या आठवणीवर कोणतेच बुलडोझर चालू शकत किंवा मॉलही बनू शकत नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी...