सलमान खानचा ‘जय हो’ हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव पूर्वी ‘मेंटल’ होते. 'जय हो'चे पहिले पोस्टर व ट्रेलर मुंबईतील चंदन टॉकीजमध्ये दाखवण्यात आले. यावेळी सलमान खानसोबतच व्यासपीठावर चित्रपट निर्माता सोहेल खान व सहभागीदार निर्माता सुनील लल्ला उपस्थित होते.
चित्रपटाचे पोस्टर चारकोलपासून बनवण्यात आले असून चित्र ब्लॅक अँड व्हाइट आहे. शिवाय ते सलमान खानच्या स्वत:च्या पेंटिंगप्रमाणेच आहे. शक्यतो त्यानेच ते बनवले असावे. सलमानची प्रतिमा खेळाडू वृत्ती आणि दबंग व्यक्ती म्हणून आहे. परंतु त्याची सर्व चित्रे ब्लॅक अँड व्हाइट आणि गंभीर आहेत. त्याच्या चित्रांमध्ये भडक रंगांचा अभाव असतो. महिलांची टिकली तेवढी लालबुंद असते.
त्याच्या एका चित्रात मदर तेरेसा यांच्या साडीचा काठ रंगीत आहे. या चित्रांमध्ये फटकळ, दबंग सलमान कोठेच दिसत नाही. उलट चित्रांवरून हा चित्रकार कुणी गंभीर व चिंताक्रांत व्यक्ती असावा असेच वाटते. मग खरा सलमान कोण? चित्रपटांमध्ये त्याची लोकप्रिय प्रतिमा व उत्साह दिसतो तर चित्रांमध्ये चिंतित आणि गंभीर व्यक्ती दिसतो. त्याला वैयक्तिक जीवनात कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.
तो एकत्र कुटुंबातील मोठा मुलगा आहे आणि स्वत:च्या कमाईतून त्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवले आहे. शिवाय कुटुंबातील सदस्यांना विश्वास आहे की कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी ‘भाई’ सोबत असणार आहे. सलमान नेहमी शूटिंगसाठी उशिरा येत असल्याचे डेव्हिड धवनने एका कार्यक्रमात म्हटले आहे. तर दु:खद प्रसंगी एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी सलमान सर्वप्रथम धावून येत असल्याचे गोविंदाने म्हटले आहे. तो दानशूर म्हणूनही प्रसिद्ध आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...