आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B.A. PASS : आगळी शाळा, वेगळा अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅमेरामॅन दिग्दर्शक अजय बहलच्या पहिल्या ‘बीए पास’ चित्रपटाची धाडसी कथा आणि तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेमुळे त्यांना चित्रपट कलेचे एमए पास मानले पाहिजे. महेश भट्ट आणि विशाल भारद्वाज यांनी चित्रपटाचे कौतुक केले. खरं तर महेश भट्टच्या सिनेमाई शाळेचा हा चित्रपट आहे आणि विशाल भारद्वाजच्या अंधारापासून मुक्त आहे. मात्र चित्रपट समाज आणि सत्तेची राजधानी असलेल्या दिल्लीतील अरुंद गल्लीबोळातील गरिबी आणि लाचारी उघड करतो. तसेच सत्तेच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे श्रीमंत अधिकारी आणि श्रीमंताच्या आलिशान बंगल्यातील अंधारदेखील उघड करतो. काळ्या पैशातून निर्माण झालेली नपुंसकता आणि कुंठित पत्नीच्या वासनेमुळे एका अनाथ किशोरवयीन मुलाचे आयुष्य कसे नष्ट होते, दाखवण्यात आले आहे. तो बुद्धिबळचा खेळाडू झाला असता. मात्र, सामाजिक कुंठा आणि दमित इच्छेच्या वातावरणात तो स्वत:च एक प्यादा बनतो. जीवनाच्या बुद्धिबळात त्याला एका भ्रष्ट अधिकार्‍याची बायको आपल्या वासनेच्या जाळ्यात अडकवते.

काही ज्येष्ठ आणि भावुक लोक नेहरू कालखंडाला चित्रपटाचा सुवर्णकाळ मानतात. आजच्या युगातील विरोधाभास सादर करणारे काही चित्रपट बनत आहेत, त्या सुवर्णकाळात ते शक्य नव्हते. तो निरागसतेचा कालखंड होता. हे निरागसतेवर नृशंस प्रहाराचे युग आहे. कालखंड चित्रपटांना प्रभावित करतो. आज ‘विकी डोनर’, ‘पानसिंह तोमर आणि ‘बीए पास’ सारखे चित्रपट बनवणे शक्य आहेत. तेव्हा याची कल्पनादेखील कधी केली जाऊ शकत नव्हती.

खरं तर या साध्या दिसणार्‍या चित्रपटात अर्थाच्या अनेक घड्या लपलेल्या आहेत. उदा- चित्रपटात एका कबरस्तानचा रखवालदार म्हातारा त्या संकटात अडकलेल्या किशोर वयाच्या मुलासोबत बुद्धिबळ खेळतो. मुलाच्या बुद्धीचे तो कौतुकदेखील करतो. मात्र कथेच्या शेवटी तो खडूस म्हातारा असा खेळ खेळतो की मुलाचा पराभव होतो. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात खडूस म्हातारे खेळाडू तरुण वयाच्या अनुभव नसलेल्या तरुणांचा पराभव करत आहेत.