आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लुटेरा’, ‘द लास्ट लिफ’ आणि बाबा नागार्जुन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी बजेटच्या ‘उडान’ चित्रपटासाठी चर्चेत असलेले दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांचा रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेला ‘लुटेरा’ चित्रपट 5 जुलै रोजी (आज) प्रदर्शित झाला. मोटवाने यांनी आपल्या चित्रपटाचे नाव ‘लुटेरा’ ठेवले ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण अशा नावाच्या जुन्या चित्रपटात कामरान, महिपाल आणि दारासिंगसारखे कलावंत काम करत होते, आज 'राउडी राठौर' अक्षयकुमार करत आहे. सध्या त्यांच्या नायकाची काही विशेष प्रतिमा तयार झालेली नाही. उद्योगात त्याला येऊन ‘जुमा-जुमा’ आठ दिवसच झाले आहेत.

असो, मोटवाने यांनी बंगालच्या जमीनदारी उन्मूलन काळाच्या पार्श्वभूमीवर एका बहुरूपी चोराची कथा दाखवली आहे. तो स्वत:ला ऐतिहासिक इमारतींचा तज्ज्ञ सांगून इमारतीच्या एका भागात खोदकाम करून मंदिरातून दागिने चोरतो. मात्र हे सर्व काम करत असताना त्याचे सावकाराची मुलगी सोनाक्षीसोबत प्रेम होते. आता चरित्र बदलाची संधी आहे.