आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या 'औरंगजेब'ची पडद्यामागील गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि अर्जुन कपूर, ऋषी कपूर अभिनीत ‘औरंगजेब’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात एका कुटुंबाच्या दोन सदस्यांच्या परस्परविरोधी विचारसरणीमुळे उत्पन्न झालेल्या संघर्षाची कथा आहे. एका सदस्याचे मत असते की, कुटुंबासाठी आपल्या स्वप्नाचा त्याग करायला हवा. दुसरा आपल्या स्वप्नासाठी कुटुंबाचा त्याग करायला तयार असतो. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे. औरंगजेबने राजसिंहासनासाठी आपल्याच भावांचा खून केला होता म्हणून चित्रपटाचे नाव 'औरंगजेब' ठेवण्यात आले. इतिहासकारांचे औरंगजेबविषयी असे मत होते. मात्र काही लोकांचा विचार आहे की, औरंगजेब खूप साधे जीवन जगत होता. चटया विणून तो आपला खर्च काढत होता. जजिया कर त्याने सगळ्यांसाठी लागू केला होता. आधी मौलवी आणि ब्राम्हण जिजियापासून मुक्त होते, त्याने या करमुक्तीला खारीज केले. त्यामुळे मौलवी आणि ब्राम्हणांनी त्याच्याविरुद्ध काल्पनिक कहाण्या रचल्या. त्याचा मुगल प्रशासनावर वचक होता. त्याने कधीच सरकारी पैसा स्वत:वर खर्च केला नाही. त्याने एखादी भव्य वास्तूही बनवली नाही.

अहमदाबादेतील एका व्यापार्‍याने त्याच्या शत्रू भावाला त्याच्या विरुद्ध लढाईसाठी कर्ज दिले होते आणि औरंगजेबने तो पैसादेखील फेडला आणि एका मंदिरासाठी जमीनदेखील दिली होती. नोबेल पुरस्कार विजेता अर्मत्य सेन यांनी केलेल्या शोधात अशा अनेक गोष्टीचा उल्लेख आहे. बर्‍हाणपूरजवळ असलेल्या राजकुमारी जैनाबादीसोबत त्यांनी अयशस्वी प्रेम केले आणि त्याच्या दु:खात विरह गीत लिहिले.