आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरी : अर्धसत्य आणि तमस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदिता पुरी यांनी ओम पुरी यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकामुळे दोघांत भांडणाची सुरुवात झाली. त्यांचे यापूर्वी कधी भांडण झाल्याचे वृत्त नाही. नंदिताने पतीविषयी खरे लिहिले की खोटे हा मुद्दा नाही तर, पती शयनगृहात पत्नीला आपल्या आयुष्यातील गुपित सांगतो आणि पत्नी शयनगृहाचे गुपित उघड करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर ती गोपनीयता भंग करते. ओम पुरी यांनी दिलेल्या सोयीचे सुख घेत, पत्नीचा अधिकार म्हणून त्याच पैशातून विकत घेतलेल्या उपकरणांवर त्याच्याच विरुद्ध पुस्तक लिहिते. प्रकाशकदेखील ओम पुरीची पत्नी असल्यामुळे पुस्तक प्रकाशित करतो.