आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनी तंत्रज्ञानामुळे गाण्यात ‘हेराफेरी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच जावेद अख्तर सलीम साहेबांच्या घरी आले होते. चित्रपट संगीतात नव्या कॉपीराइट अँक्टमुळे आलेल्या बदलावर चर्चा रंगली. एक संगीत कंपनी आता आपल्या अटीवरच चित्रपट संगीत विकत घेत आहे आणि नव्या कायद्यामार्फत गायक, गीतकार व संगीतकारांना देण्यात आलेल्या अधिकारांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या येथे कितीही कडक कायदे येवोत, त्यातूनही येथील विद्वान तज्ज्ञ मार्ग काढतातच. सलीम-जावेदच्या ‘जंजीर’ च्या दुसर्‍या आवृत्तीची तयारी जेव्हा सुरु होती, तेव्हा आपल्या अधिकारासाठी दोघांनी कायदेशीर लढाई लढली. तीस वर्षांपूर्वी वेगळे झालेले दोन दिग्गज पुन्हा एकत्र आले. न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेरही अनेकदा भेटले. दोघांनी आपल्या मनाच्या न्यायालयातदेखील डोकावून पाहायला हवे. आता तर संगीत अधिकाराच्या संकटामुळे दोघांच्या भेटी होत असतात. त्यांच्या शैलीत बनलेला ‘गुंडे’ चित्रपट यशस्वी होत असताना या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाही की, सलीम-जावेद यांनी पुन्हा एकत्र येऊन पटकथा लिहाव्यात. मात्र, दोन शिक्षित आणि संस्कारी पूर्वीसारखे संबंध नसले तरी सामान्य सद्व्यवहार ते नक्कीच करू शकतात. कोणत्याही एका समान आदर्शासाठी खांद्याला खांद्या लावून लढू शकतात. शत्रूचा शत्रू आपला मित्र या अडाणीपणापासून बचाव करू शकतात.सगळ्या प्रमुख तार्‍यांनी मिळून एका नव्या कंपनीला संगीत अधिकार द्यावेत. त्यात ते भागीदार होऊन एकाधिकाराने लढू शकतील, असा सल्ला सलमान खानने दिला आहे. खरं तर, आजकाल प्रत्येक क्षेत्रात माणूस पाहूनच काम केले जाते.
आज ध्वनी मुद्रण तंत्रज्ञानात इतका विकास झाला आहे की, आज कोणच्याही आवाजात रेकॉर्ड झालेले गाणे किशोर कुमार किंवा मोहंमद रफी यांच्या आवाजातदेखील बनवले जाऊ शकते. स्वर्गवासी गायकांच्या गाण्यातून काही अक्षर आणि सूर निवडून नव्या गाण्याच्या जागी ठेवले जाऊ शकते. मात्र, या कामात खूप वेळ लागतो. साजिद नाडियादवाला सलमान खान अभिनीत ‘किक’मध्ये असाच प्रयोग करणार आहेत. ‘मुगले आजम’ला रंगीत बनवण्यात जितका पैसा आणि वेळ लागला त्याहीपेक्षा कमी वेळ व पैसा ‘नया दौर’ आणि ‘हम दोनों’च्या रंगीत आवृत्तीत लागला. तंत्रज्ञानाचा प्रत्येक शोध सुरुवातीला महाग असतो. मात्र, काही काळ निघून गेल्यानंतर तो स्वस्त होतो.
तंत्रज्ञानाद्वारे आवाज बदलल्याने खर्‍या गायकाला रॉयल्टी मिळेल का? उदा. - लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचा अंश निवडून एक नवीन गाणे बनवले जाऊ शकते, जे लताजींनी कधीच गायले नाही तरीदेखील त्यांना रॉयल्टीपासून वंचित केले जाऊ शकत नाही. त्यावर त्यांचा अधिकार आहे. तंत्रज्ञान खूप काही करू शकते, ते र्मयादित आहे. खरं तर, कल्पकता फक्त माणसाचाच अधिकार आहे. शास्त्रज्ञांनी बनवलेला एक रोबोट सगळे काही करू शकतो. मात्र, प्रेम करू शकत नाही, माणसाप्रमाणे कविता करू शकत नाही. मानवी करुणा आणि संवेदना कोणत्याही प्रयोगशाळेत तयार केली जाऊ शकत नाही. मात्र, बाजार आणि जाहिरातीवर चाललेल्या जगात संवेदना नसलेली, भावनाशून्य माणसे असू शकतात. या भीतिदायक वेळेचा अंदाज घेऊनच अल्बर्ट कामोंने ‘आउटसायडर’च्या नायकाची रचना केली. यावर आधारित ‘विविर’ समरेश बसू यांनी बनवला. भारतात ध्वनीला दिव्य मानतात. खरं तर हा लोकप्रिय भ्रम आहे की, विज्ञान आणि धर्मात भांडण आहे. दोघेही सत्याच्या शोधात आहेत.
एक प्रयोगशाळेत आणि दुसरा श्रद्धेत. ज्या दिवशी विज्ञान आणि तंत्रज्ञान जीवन-मृत्यूचे सगळे रहस्य उघड करतील, तेव्हा एक नवा धर्म तयार होईल. उपेक्षा करणार्‍यांनी कधीच तर्कसंगत, शास्त्रीय विचारातून आख्यानाची व्याख्या करू दिली नाही आणि विचारांच्या क्षेत्रात धुके पसरू दिले. आता विज्ञान एक एक पदर उघडत आहे. जणू काही कबीराच्या ओळीची व्याख्या करत आहे.
‘घूंघट के पट खोल, तोहे, पिया मिलेंगे,
झूठ मत बोल तोहे पिया मिलेंगे’.
देव सत्य आहे, त्याला पडद्याची गरज नाही, मात्र आपण पडद्यांचीच पूजा करत आलो आहोत.