Home | Feature | Parde Ke Peeche

पॅरिसमध्ये कंगनाची ‘पाणीपुरी’

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 11, 2014, 05:12 PM IST

ज्याप्रमाणे ‘हायवे’ आलिया भट्टचा चित्रपट आहे त्याचप्रमाणे ‘क्वीन’ कंगना रनोटचा चित्रपट आहे. चित्रपटात ऐन लग्नाच्या वेळी नवरदेव तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देतो. तो फक्त तिचा वापर करू इच्छित असतो. ती मुलगी पॅरिस आणि अँमस्टरडमच्या प्रवासादरम्यान काही चांगल्या लोकांना भेटून आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवते. तिचा बदलेला आत्मविश्वास तिच्या चालण्यात दिसून येतो. नंतर ती त्या अहंकारी नवरदेवाला धडा शिकवते. संपूर्ण चित्रपटात तिचा भाव व्यक्त होत असतो.

 • Parde Ke Peeche
  ज्याप्रमाणे ‘हायवे’ आलिया भट्टचा चित्रपट आहे त्याचप्रमाणे ‘क्वीन’ कंगना रनोटचा चित्रपट आहे. चित्रपटात ऐन लग्नाच्या वेळी नवरदेव तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देतो. तो फक्त तिचा वापर करू इच्छित असतो. ती मुलगी पॅरिस आणि अँमस्टरडमच्या प्रवासादरम्यान काही चांगल्या लोकांना भेटून आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवते. तिचा बदलेला आत्मविश्वास तिच्या चालण्यात दिसून येतो. नंतर ती त्या अहंकारी नवरदेवाला धडा शिकवते. संपूर्ण चित्रपटात तिचा भाव व्यक्त होत असतो.
  कंगना रनोटच्या 'क्वीन' या सिनेमाविषयीचा जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Parde Ke Peeche

  अँमस्टरडममध्ये चार वेगवेगळ्या देशाचे तरुण एकत्र राहतात. तरुण वय सोडता त्यांच्यात काहीच साम्य नसते. त्यांची भाषा, राहणीमान, खाणेपिणे सगळेच वेगळे असते. मात्र, भिंतीवरच्या पालीला सगळेच घाबरतात. त्यांना आपले हसूदेखील येते. त्यांचे धर्मदेखील वेगळे आहेत मात्र संवेदनेची दोरी त्यांना आपसात बांधून ठेवते. कंगनाला त्यांची भीती वाटते, त्यामुळे ती बाहेर बेंचवर झोपते. दुसर्‍या दिवशी तिघेही बाहेर झोपायला तयार असतात जेणेकरून ती निर्भयपणे खोलीत झोपू शकेन. आपसातला समजूतदारपणा आपसातल्या सहकार्यानेच बनत असतो. तुम्ही जेव्हा कोणाची काळजी करता, तेव्हा न बोलतादेखील ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचते. ही मानवी मनाची कमाल आहे की, एक जपानी तरुण ज्याने सुनामीत आपले कुटुंब गमावलेले असते, तो कंगना आणि इतर मित्रांमध्ये कुटुंब बघतो. मानवी संवेदनेचा जन्म अवघड परिस्थितीत होतो आणि जीवन सरळ बनते. कंगना सगळ्यासाठी भारतीय पद्धतीने न्याहारी बनवते. ती त्याला फ्रेंच टोस्ट म्हणते. त्यावर तिचा एक फ्रांसीसी मित्र म्हणतो की, हा फ्रेंच टोस्ट नक्कीच नाही. मात्र सगळेच ते आवडीने खातात. कारण भूक पाककला कोणत्या देशाची आहे हे पाहत नसते. भूक सगळ्या देशांना विवशतेने का होईना मात्र जोडण्याचे काम करते. विपुल खाद्यसामग्री लोकांना वेगळे करते, भूक जोडते. जीवनात कितीही विरोधाभास आणि विसंगती असो मात्र मानवी संवेदना सगळ्यावर भारी पडते. 

 • Parde Ke Peeche

  रस्त्यावर दुकान चालवणारा माणूस कंगनाला शोधून तिचे पैसे परत करतो कारण तिला त्याने बनवलेले जेवण आवडत नसते. तो तिला भोजन मेळ्यात येण्याचे आव्हान करतो. कंगना आपल्या मित्रांच्या मदतीने पाणीपुरी विकण्यात यशस्वी होते. एक युरोपियन ग्राहक एक पाणीपुरी तोंडात ठेवतो, तिखट असल्यामुळे तो तिथून निघून जातो मात्र काहीच क्षणात परत येतो. सुरुवातीला तिखट लागते मात्र नंतर चविष्ट लागते, असे म्हणतो. जीवनातदेखील असे होत असते, एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसते नंतर तिचा स्वीकार करतो. कंगनाला नकार देणारा नवरदेव तिचा युरोप प्रवास पाहून प्रभावित होतो. याच युरोपियन पाणीपुरीसारखा अनुभव येथे दुसर्‍या रूपात समोर येतो. ती ग्राहकाचा स्वीकार करते मात्र त्या नवरदेवाला नकार देते, कारण लग्न पाणीपुरी नव्हे. 

 • Parde Ke Peeche
  दिग्दर्शक विकास बहल आपली स्वतंत्र शैली खूपच वेगळ्या पणाने सादर करतात. कारण ते ‘चिल्लर पार्टी’ नावाच्या चित्रपटाशी जोडलेले होते. भारतीय चित्रपटात प्रत्येक काळात नवी प्रतिभा अनपेक्षित स्रोतातून येत आली आहे. गेल्या वर्षी अजय बहल ‘बीए पास’ घेऊन आले होते. भारतात प्रतिभेची कमतरता नाही. कंगनादेखील छोट्या शहरातून आली आहे. तिची शिकण्याची इच्छा इतकी प्रबळ आहे की, अमेरिकेहून ती पटकथा लिहिण्याचा कोर्स करून आली आहे. या चित्रपटात वेगळ्या देशातील लोकांच्या मैत्रीचे दृश्य, भारतात प्रांतवादाची भावना जागवून एक वेगळ्या प्रकारची सामाजिक फाळणी रचली जात आहे, असे अधोरेखित करते का? असो, ‘क्वीन’चा ताजेपणा, कंगनाची विलक्षण प्रतिभा आणि दिग्दर्शकाच्या गुणवत्तेचा आग्रह या चित्रपटाला पाहण्याचे कारण असू शकते. ‘गुलाब गँग’देखील पाहण्याजोगा चित्रपट आहे. हे सगळे विविध चित्रपट भारतीय सिनेमाच्या ताकदीचे प्रमाण आहेत. याबरोबरच सिनेमादेखील अखिल भारतीयतेचे प्रतीक आहे, हेदेखील आश्चर्यजनक आहे. 
   

Trending