Home | Feature | Parde Ke Peeche

राज्यसभा दूरदर्शनची भेट ‘संविधान’

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 14, 2014, 03:04 PM IST

राज्यसभा दूरदर्शनसाठी श्याम बेनेगल यांनी ‘संविधान’ नामक टेलिफिल्म तयार केली आहे. ही फिल्म दूरदर्शनसह शाळांमध्ये दाखवण्यात येईल, जेणेकरून भविष्यातील नागरिकांनी आपल्या देशाची राज्यघटना समजून घ्यावी आणि ती तयार करताना आलेल्या अडचणी व संघर्ष त्यांना माहिती करून घेता येईल.

 • Parde Ke Peeche

  राज्यसभा दूरदर्शनसाठी श्याम बेनेगल यांनी ‘संविधान’ नामक टेलिफिल्म तयार केली आहे. ही फिल्म दूरदर्शनसह शाळांमध्ये दाखवण्यात येईल, जेणेकरून भविष्यातील नागरिकांनी आपल्या देशाची राज्यघटना समजून घ्यावी आणि ती तयार करताना आलेल्या अडचणी व संघर्ष त्यांना माहिती करून घेता येईल. घटनेची निर्मिती सन ‘46’ मध्ये सुरू झाली आणि तीन वर्षांनंतर ‘49’ मध्ये पूर्ण झाली. या कालखंडात हे शक्य होऊ शकले. कारण त्या काळात भारतात अत्यंत सर्मपित आणि प्रतिभावंत लोक होते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लोक भारताला चांगल्या प्रकारे समजून घेत होते आणि त्यांना इतर प्रजासत्ताक देशांच्या घटनेची सखोल माहितीदेखील होती. म्हणून पूर्व आणि पश्चिमेकडील राजकीय विचारांचे श्रेष्ठ मिश्रण यात समाविष्ट आहे.

  भारताची राज्यघटना तयार करणे हे कोणत्याही इतर देशापेक्षा जास्त अवघड काम होते. कारण भारतात विविध भाषा आणि अगणित बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. तसेच अनेक धर्मांना मानणारे नागरिकही राहतात. जरी महात्मा गांधी घटना समितीचे सदस्य नसले, तरी त्यांचा प्रभाव याच्या निर्मितीवर जास्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असामान्य प्रतिभेचे धनी होते. तसेच त्यांचे गांधीजींसोबत जाती व्यवस्थेबाबत मतभेदही होते, परंतु मतभेदाचा अर्थ शत्रुत्व नसणारा हा काळ होता.

  जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Parde Ke Peeche


  सचिन खेडेकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली आहे. काही वर्षांपूर्वी सचिनने श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. दिलीप ताहिलने ‘भाग मिल्खा भाग’मध्ये जवाहरलाल नेहरूंची छोटीशी भूमिका केली होती. असे असले तरी चित्रपटात ही भूमिका मोठी आणि महत्त्वाची आहे. दिलीप ताहिलने नेहरूंच्या भाषणांच्या टेप वारंवार ऐकल्या आणि जुनी वृत्तचित्रेही पाहिली. याच प्रकारची तयारी इतर सर्व कलावंतांनी केली.

 • Parde Ke Peeche

  या चित्रपटाच्या तीन महिन्यांपर्यंत चालणार्‍या चित्रीकरणासाठी संसदेचा सेट लावण्यात आला होता. कला दिग्दर्शक चेतन पाठकने सखोल अभ्यास आणि अत्यंत मेहनतीने विश्वसनीय सेट तयार केले होते. तसेच स्वरा भास्करचा अपूर्णांक उपलब्ध संसद भवनात करण्यात आला. राज्यसभा दूरदर्शनकडे साधने असताना श्याम बेनेगल यांच्यासारखा दिग्दर्शकच विश्वसनीयता आणू शकला. त्यांना नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियावर मालिका तयार करण्याचा अनुभवही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे असलेला तर्कपूर्ण दृष्टिकोन आणि अँस्थेटिक्स मूल्य कोणत्याही दिग्दर्शकाकडे नाही. अशा प्रकारच्या ऐतिहासिक नाट्याची निर्मिती करणे सोपे काम नाही. यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनही असला पाहिजे. या दहा भागांच्या मालिकेसाठी एका टीमने वर्षभर संशोधन केले. आता ही मालिका सर्व भारतीय भाषांमध्ये डब केली जात आहे.
   

 • Parde Ke Peeche

  आजच्या राजकारणामध्ये सुरू असलेला गदारोळ, गोंधळ आणि सत्तालोलुपता पाहता त्या काळात डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी किती वादविवाद व अंतर्गत संघर्षाला सामोरे जात राज्यघटनेची निर्मिती केली असेल. आज प्रत्येक पक्षात अनेक पक्ष आहेत. विघटनवादी शक्ती त्या काळातही सक्रिय होत्या. त्यामुळे निर्मितीचे काम सोपे नव्हते. आज आपण भारताचे तुटण्या-कोसळण्यासारखे रूप पाहत आहोत. त्या काळातही या सर्व प्रवृत्ती जिवंत होत्या. असे असताना धर्मनिरपेक्षतेचा पाया किती अडचणींचा सामना करत रचण्यात आला असेल, याची जाणीव होते. प्रत्येक नेत्याने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली, परंतु सर्वाधिक दबाव डॉ. आंबेडकरांवर राहिला असेल. त्यांनी खालच्या जातीत जन्म घेऊन आपल्या असामान्य प्रतिभेद्वारे उच्च शिक्षण घेतले. त्यांचा दृष्टिकोन अत्यंत तर्कशुद्ध आणि आधुनिक होता. मात्र, ते या देशाचा सामाजिक इतिहास, विविध प्रवृत्त्या आणि अज्ञान याच्याशीदेखील उत्तमरीत्या परिचित होते. कारण त्यांचे संपूर्ण आयुष्यच नकरात्मक प्रवृत्तींविरोधात संघर्ष करण्यात गेले होते.

  आजकाल एक जाहिरात वारंवार टीव्हीवर दाखवली जात आहे. यामध्ये एक लहान निरागस मुलगी इतिहासाच्या दुबरेध मजकुराशी झुंज देते. तसेच तिच्या समोर बाबर, अकबर आणि हुमायूं उभे राहतात. ते म्हणतात की, तू ज्या इतिहासाशी झुंज देत आहे, आम्ही त्याच इतिहासाची पात्रे आहोत. तुझी मदत करण्यासाठी आलो आहोत. ते तिघेही तिला चॉकलेट देतात आणि म्हणतात, हे खाऊन तुझ्यात एवढी ताकद आणि स्फूर्ती येईल की यामुळे तुला इतिहास माहीत होईल. या जाहिरातीमध्ये अनेक अर्थ, संकेत दडलेले आहेत. इतिहासाची पात्रे सजीव पाहिल्याने त्यांना समजून घेणे सोपे जाते. वस्तुत: सक्षम नसलेले शिक्षक आपला विषय समजून घेऊनही दुबरेध बनवतात, जेणेकरून त्यांचे महत्त्व वाढेल आणि त्यांचे अज्ञान लपून राहील. असो, ‘संविधान’ संपूर्ण नागरिकांसह लहान मुलांसाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घटनेने त्यांचे संरक्षण केले? आणि ते घटनेचे संरक्षण करतील? हे प्रश्न मात्र हवेतच राहतील.

Trending