Home | Feature | Parde Ke Peeche

‘शौकीन’ची नवी आवृत्ती

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 15, 2014, 11:44 AM IST

अनेक दशकांपूर्वी बासू चटर्जी यांनी ‘शौकीन’ बनवला होता. यात तीन वृद्ध आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा एकदा सकाळच्या अनुभवातून जाण्याच्या इराद्याने ‘गोव्या’ला येतात आणि आपले आजपर्यंत धष्टपुष्ट राहण्याचे किस्से कोणीही त्यावर विश्वास ठेवत नसल्याचे माहीत असतानाही एकमेकांना सांगतात. हे एक प्रकारे स्वत:ला दिलासा देण्यासारखे आहे. ते ज्या मुलीबाबत किस्से तयार करतात ती मुलगी त्यांच्या तरुण वाहनचालकावर प्रेम करते. चित्रपटात चालकाची भूमिका मिथून चक्रवर्तीने साकारली होती. मात्र, कथेचा मेरुदंड ते तीन वृद्धच होते. तसेच त्यांची मैत्री चित्रपटाच्या यशाची गुरुकिल्ली होती. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध हिंदी साहित्यिक गुलशेर शानी यांनी लिहिली होती. सर्व ताजेपणा त्यांनीच रचला होता.

  • Parde Ke Peeche

    आता ‘शौकीन’च्या नव्या आवृत्तीत मिथुनची भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. तसेच हा चित्रपटही त्याच्याच जोरावर विकला जात आहे. त्यामुळे मूळ वृद्धांचा फोकस आता बदलून टाकला आहे. तुम्ही स्टारपद घेताच कथेच्या टोपीला स्टारच्या डोक्याच्या आकाराचा बनवता आणि याला सिनेमावाले ‘व्यावहारिकता’ म्हणतात. सर्व करार ‘व्यावहारिकते’च्या नावावरच केले जातात. वस्तुत: ‘व्यावहारिकता’ ही पक्षांतर करणारे लोक घालत असलेली टोपी आहे. ‘शौकीन’च्या नव्या आवृत्तीबाबत रुमी जाफरी सुरुवातीला बोलले होते. मात्र, निर्मात्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे आता याची निर्मिती अभिषेक शर्मा करत आहेत. शर्मा यांनी ‘तेरे बिन लादेन’ नावाचा कल्ट चित्रपट बनवला होता. तसेच याचा दुसरा भागही त्यांनी तयार केला आहे. खेदाची बाब म्हणजे नव्या आवृत्तीत गुलशेर शानी यांचा कुठेच उल्लेख नाही. तथापि, मूळ आवृत्तीच्या लेखकाचे स्मरण करणे गरजेचे आहे. मूळ आवृत्तीत वृद्धांच्या भूमिका उत्पल दत्त, अशोक कुमार आणि ए. के. हंगल यांनी साकारल्या होत्या. आता अनुपम खेर, बोमन इराणी करत आहेत. परेश रावल यांनी मोदी बायोपिकमुळे चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात तीन वृद्ध स्वत:ला ताकदवान प्रेमवीर सिद्ध करून दाखवण्यासाठी खोटे बोलतात. याच प्रकारचे खोटे तीन युवा पात्र सई परांजपे यांच्या ‘चष्मे बद्दूर’मध्ये बोलतात. तसेच महिला पात्राच्या अवतीभोवती रचलेल्या खोटारडेपणावरच संपूर्ण नाट्य आधारित आहे.
    मात्र, अशा प्रकारचा खोटारडेपणा महिलेला बदनाम करतो, अशी समाजाची संरचना आहे. नव्या आवृत्तीत नर्गिस फाखरी काम करणार होती, परंतु आता तिला हॉलिवूडचा एक चित्रपट मिळाला आहे. त्यामुळे तिने ‘शौकीन’ला गुडबाय केले आहे. त्यानंतर यामी गौतमशी चर्चा झाली पण त्यातही अडचण आली होती. निर्मात्याला अक्षय कुमारकडून तारखा मिळाल्या असून त्याचा फायदा घ्यावा लागेल, अन्यथा अक्षयच्या तारखांसाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागू शकते. चित्रपटसृष्टीत यशस्वी तार्‍यांच्या इच्छेच्या अनुरूपच सर्व कामे करावी लागतात. अशा प्रकारच्या कार्यशैलीत गुणवत्तेची अपेक्षा कशी करता येईल? स्टार एक टॅक्सी असून त्यात बसून कुठे जायचे किंवा दुसरा कोणताही विचार केला तरी त्याच्या भाड्याचे मीटर सुरूच आहे. तसेच तुम्हाला प्रत्येक क्षणाचे पैसे द्यायचे आहेत. राज कपूर यांनी शशी कपूर यांना त्यांच्या भरभराटीच्या काळात टॅक्सी म्हटले होते. त्या काळात एकमेव शशी कपूरच टॅक्सी होते. आता तर सर्व सिनेतारे टॅक्सी आहेत.
    काही लोक तर करारनाम्यातच लिहितात की, चित्रपटाच्या शूटिंगसाठी इतके दिवस, डबिंगसाठी इतके दिवस आणि प्रदर्शनापूर्वीच्या प्रचारासाठी कालर्मयादा निश्चित केलेली आहे. अतिरिक्त वेळेची मागणी केल्यावर अतिरिक्त पैसा मोजावा लागतो. आता सर्जनशील कामे वेळापत्रकानुसार होत नाहीत. के. आसिफ यांना ‘मुघल ए आझम’ बनवण्यासाठी दहा वर्षे लागली आणि बजेट शेकडो पटीने वाढले. मात्र, प्रदर्शनाच्या सात दशकांनंतरही लोक या चित्रपटाचे आजही स्मरण करतात. आज प्रत्येक सिनेतार्‍यासोबत एक योग्य व्यवस्थापक आणि प्रशिक्षित चार्टर्ड अकाउंटंट असतात. तसेच ते त्याला बाजारपेठेतील एक विकाऊ ब्रँड बनवतात. मात्र, अशा वेळीही बहलसारखे दिग्दर्शक ‘क्वीन’ बनवतात, इम्तियाज अली ‘हायवे’ तयार करतात. बाजारपेठेच्या लोखंडी तटबंदीतही कोणती ना कोणती खिडकी खुली राहतेच.

Trending