Home | Feature | Parde Ke Peeche

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्रेमकथा

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 20, 2014, 10:00 AM IST

क्रिकेटपटू विराट कोहली आणि यशाच्या शोधात असलेल्या अनुष्का शर्माची प्रेमकथा चर्चेत आहे. अलीकडेच बांगलादेशमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत पराभव झाल्याने दु:खी विराट अनुष्काच्या बाहुपाशात थोडा विसावला.

  • Parde Ke Peeche
    क्रिकेटपटू विराट कोहली आणि यशाच्या शोधात असलेल्या अनुष्का शर्माची प्रेमकथा चर्चेत आहे. अलीकडेच बांगलादेशमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत पराभव झाल्याने दु:खी विराट अनुष्काच्या बाहुपाशात थोडा विसावला. दोघांची भेट श्रीलंकेत झाली. तेथे अनुष्का अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेलवेट' चित्रपटाचे शूटिंग करत होती. चित्रपटाचा नायक रणबीर कपूरदेखील मैत्रीण कतरिना कैफसोबत चित्रीकरणासाठी तिथेच होता. या चित्रपटाची कथा पाचव्या दशकाच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्या काळातील मुंबईचा एक सेट श्रीलंकेत लावला जाईल, जेणेकरून श्रीलंकेच्या पर्यटन विभागाला त्याचा फायदा होऊ शकेल. काही दशकांपूर्वी दीपा मेहताला 'वॉटर'चे चित्रीकरण बनारसमध्ये करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, दंगा घालणार्‍या टोळीमुळे ते शक्य झाले नाही, शूटिंगच्या विरुद्ध कथित 'जल समाधी' घेणारा तरुण काही दिवसांनंतर अलाहाबादमध्ये दिसला. त्याने सांगितले की, पैसे घेऊन बुडून मरण्याचे नाटक त्याने अनेकदा केले आहे. 'वॉटर'वर आधारित पुस्तकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. दीपा मेहतानेदेखील बनारससारखा सेट श्रीलंकेत लावून तेथे शूटिंग केले होते. शेवटी भारताच्या बाहेर भारतातील दृश्यांसाठी दिग्दर्शक श्रीलंकेत जातात.
    असो, क्रिकेट खेळाडू आणि महिला कलावंतांच्या प्रेमाची परंपरा राहिलेली आहे. याची सुरुवात नवाब पटौदी आणि शर्मिला टागोर यांनी केली होती. त्यांचा मुलगा सैफ अली खान करीना कपूरचा पती आहे. एकेकाळी सलीम दुर्राणी आणि परवीन बॉबीच्या प्रेमप्रकरणाची अफवा होती. दोघांनी बी.आर. इशारा यांच्या एका चित्रपटात कामदेखील केले होते. अभिनेत्री रीना रॉयनेदेखील पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले होते. वेस्ट इंडीजच्या सर सोव्हर्सने एक सामना चार दिवसांतच संपवण्याच्या अटीवर जिंकला होता. कारण पाचवा दिवस तो चित्रपट कलावंत अंजू महेंद्रूसोबत घालवू इच्छित होता. टीव्ही कलावंत नीना गुप्तानेदेखील विवियन रिचर्डससोबत प्रेम केले होते. त्यांच्या मुलीचे नाव मसाबा आहे. शेन वार्नचे एखाद्या मुलीवर आकर्षित होणे त्याने घेतलेल्या विकेटच्या संख्येइतके आहे. अनेक वर्षांपर्यंत खेळाडू राजसिंह डुंगरपूर आणि लता मंगेशकर यांचे अंतरंग संबंध असल्याचीदेखील अफवा होती. अझहरुद्दीनने संगीता बिजलानीसोबत लग्न केले होते.
    सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, निवडणुका विशेष आहेत. मात्र, त्यांचा स्थायी प्रेमभाव क्रिकेट आणि सिनेमाच राहिलेला आहे. दोन्हींमध्येही अनिश्चिततेचा भाव समान आहे. भारतीय जनता जीवनाच्या याच भावामुळे या दोघांनाही पसंत करत असावी. विशेष म्हणजे पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्येदेखील भारतीय सिनेमा आणि क्रिकेट खेळाडूंसाठी समान उत्साह आहे. इतका वेडेपणा आहे की, अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रश्न उभा केला नाही की, आयपीएल नावाच्या तमाशात देशाची किती वीज आणि पाणी खर्च होईल, तेदेखील उन्हाळ्यात. अशा वेळी विद्यार्थी जगत परीक्षेत व्यग्र असतो. खेड्यातील लोक मैलभर चालून हंडाभर पाणी घेऊन येतात. शेतकरी विजेच्या कमतरतेमुळे मोटार चालू करू शकत नाहीत.
    या खेळाबरोबरच सट्टा, फिक्सिंग इत्यादी गुन्हेदेखील जोडलेले आहेत. क्रिकेट मंडळाच्या सध्याच्या अध्यक्ष्यांचा जावई आणि त्यांचा आवडता कर्णधारदेखील प्रश्नांच्या पिंजर्‍यता आहे. एक तपासणी उघड होऊ नये म्हणूनदेखील प्रयत्न केला जात आहे. क्रिकेटमध्ये पैसा आणि नाव जास्त असल्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे नेतेदेखील प्रादेशिक संघटनांचे अध्यक्ष आहेत. त्यात नरेंद्र मोदीदेखील सामील आहेत. हा मोसम निवडणुकीचा आहे, आयपीएलचादेखील आहे आणि सिनेमा तर भारतीय जनमानसचा 'बारा महिने' स्थायी भाव आहे. शेवटी महान भारताला विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेमकथेत नक्कीच रस असेल. खरे तर, हा मोसमच गोंधळलेला आहे. बघ्यांसाठी निवडणुका, क्रिकेट आणि सिनेमाचे कॉकटेल वेडेपणालाच उत्सव बनवणार.

Trending