कचर्‍याची व्यवस्था आणि / कचर्‍याची व्यवस्था आणि व्यवस्थेचा कचरा

Mar 21,2014 09:45:00 AM IST
आमिर खानने आपल्या ‘सत्यमेव जयते’च्या दुसर्‍या भागात कचर्‍याची समस्या सादर केली. त्याच्या रिसर्च टीमने यावर खूप मेहनत घेतली होती. खरे तर, कचर्‍याचा विषय उचलणे कौतुकास्पद बाब आहे. गोळा केलेला कचरा शहरातून डम्पिंग मैदानावर टाकण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी 2300 कोटी रुपये खर्च करते, ही गोष्ट कोणत्याही मुंबईकराला माहीत नव्हती. हजारों टन कचर्‍याचे डोंगर बनलेले आहेत, जणू काही पृथ्वीची घाण आकाशाला प्रश्न विचारत आहे. काही महानगरांनी कचरा जाळण्यासाठी विदेशातून मोठे इन्सिनरेटर विकत घेतले आहेत. मात्र, त्या ज्ञानी अधिकार्‍यांना माहीत नाही की, पश्चिमेच्या कचर्‍यात रिकाम्या बॉटल, प्लास्टिकचे डब्बे आणि बॅटर्‍या आदी असतात. तथापि, भारतात ओल्या कचर्‍याची टक्केवारी कोरड्या कचर्‍यापेक्षा जास्त असते. हा ओला कचरा बायोगॅस बनवण्याच्या कामी येऊ शकतो. यापासून निर्मित झालेले खत हजारो एकर नापीक जमिनीला सुपीक बनवू शकते. हे खत केमिकल खताप्रमाणे धोकादायक नसते, ओला कचरा म्हणजेच आपले उरलेले अन्न, फळांची साले, भाज्यांचे देठ इत्यादी. तथापि, कोरड्या कचर्‍यात प्लास्टिक, काच, पॉलिथीन बॅग आदी येते.
आमिर खानच्या कार्यक्रमात भाभा संस्थेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, फक्त बत्तीस हजारांत ते कचर्‍याने बायोगॅस बनवण्याचे उपकरण आणि नियंत्रित करण्याची प्रक्रिया विकतात. ही किंमत कोणत्याही संस्थेसाठी फार कमी आहे. खरे तर, महानगराच्या कचर्‍यापासून इतका बायोगॅस बनू शकतो की, महानगरातील घरांत कामी येऊ शकतो. काही संस्थांनी अशा कामात पुढाकारदेखील घेतला आहे. एका तज्ज्ञाने सांगितले की, कचरा व्यवस्थेच्या नावावर मोठी जमीन ठेकेदाराला दिली जाते, त्याबरोबरच पैसादेखील दिला जातो. तो ठेकेदार काम न करता पैसो कमावतो. त्यांचे म्हणणे होते की, सगळ्या शहरांच्या पालिकेने केलेला खर्च भारताचा सर्वात मोठा स्कॅम होऊ शकतो. यातूनही पैसा कमावला जातो. म्हणून भारतीयांना धन्य म्हटले पाहिजे. लाखो कर्मचारी हे काम करत असतात. एका खासगी कंपनीने स्वच्छ कपडे घालून कचरा उचलण्यासाठी महिलांना नियुक्त केले आहे. कचर्‍यापासून ऊज्रेचे उत्पादनच पर्यावरणाचे रक्षण करू शकते. विमानतळाच्या जवळ डम्पिंग ग्राउंडची परवानगी नसते. कारण कचर्‍याच्या डोंगरावर अन्नाच्या शोधात आलेल्या पक्ष्यांमुळे विमानाला धोका होऊ शकतो.
या सगळ्या गोष्टीची भीतिदायक बाजू म्हणजे या कचर्‍याच्या डोंगरावर पाऊस पडतो, ऊन पडते आणि या रासायनिक प्रक्रियेमुळे जवळपासच्या वातावरणात विषारी गॅस पसरू लागतो. तेथील रहिवाशांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. जेव्हा त्यांनी फ्लॅट विकत घेतला होता, तेव्हा त्यांनी कल्पनादेखील केली नव्हती की, काही किलोमीटर अंतरावर डम्पिंग ग्राउंड होईल.
आपण सगळ्यांनी ‘युज अँड थ्रो’ जीवनशैली अंगीकारली आहे. आपण अशा वस्तू विकत घेतो ज्यांचा वापर फक्त एकदाच केला जातो. ही जीवनशैली प्रचंड कचर्‍याला जन्म देते. खरे तर ही फक्त सुविधाजनक जीवनशैली नव्हे, तर यात आपण वापरलेल्या वस्तू टाकतो. तथापि, ही गोष्ट आपल्या नात्यातदेखील येते. मित्राचा वापर करणे आणि नंतर त्याच्यापासून दूर जाणे, एवढेच नव्हे तर हाच दृष्टिकोन कुटुंबामध्येदेखील आला आहे. ज्येष्ठांसाठी आता घरात जागा उरली नाही. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की, प्रत्येक छोटी सवय, प्रत्येक छोटी सुविधा कालांतराने मानसिकतेचा एक भाग बनते आणि ‘युज अँड थ्रो’ लाइट्स, बॉल पेन इत्यादी पसरून नात्यात आणि घरात शिरतात. याबरोबरच राजकीय पक्षदेखील ज्येष्ठांना दूर करत आहेत. आमिर खान इतर कलावंतांपेक्षा वेगळा आहे. सामाजिक बांधिलकी त्याच्या विचारशैलीचा भाग आहे. निवडणुकीनंतर व्यवस्थेत कधी ओला कचरा, तर कधी कोरडा कचरा येत असतो.
X