आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅजेडी सिनेमांचा दिलीप यांच्यावर झाला होता परिणाम, उपचारासाठी जावे लागले लंडनला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वद वर्षांचे दिलीपकुमार आजारी पडल्यावर तशा प्रकारच्या प्रार्थना सभा झाल्या नाहीत, जशा ‘कुली’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दु:खापत झालेल्या अमिताभ बच्चन यांच्यासाठी झाल्या होत्या. याचे स्वाभाविक कारण म्हणजे तो एक विरळ अपघात होता शिवाय अमिताभ बच्चन युवा आणि नामांकित कलावंत होते. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील आपल्या कौटुंबिक मित्राला पाहण्यासाठी रुग्णलयात गेल्या होत्या. त्या घटनेनंतर गांधी आणि बच्चन कुटुंब विभक्त झाले ही वेगळी गोष्ट आहे.

दिलीपकुमार आज आपल्या जीवनाच्या मावळत्या काळात आहेत, त्यांना आपला शिखर काळ पूर्णपणे आठवतही नसेल. दिलीप यांनी 1944 ते 1998 पर्यंत 54 वर्षे बॉलिवूडला दिली. इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 60 पेक्षा जास्त चित्रपट केले. त्यात पाहुण्या कलावंतांच्या भूमिकादेखील सामील आहेत.