आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानमध्ये प्रतिष्ठेची लढाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोणची स्टार योग्यता माजी प्रियकर रणबीर कपूरसोबत केलेल्या चित्रपटामुळे वाढली आहे. तिने आपला आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रचारासाठी त्याच्या निर्मितीच्या बाबतीत आपल्या ब्लॉगमध्ये खूप काही लिहिले आहे. यामुळे चित्रपटाचा नायक शाहरुख खान प्रेरित झाला असून चार महिने शांत बसल्यानंतर या माध्यमात पुन्हा सक्रिय होत म्हणाला की, ‘धार्मिक असहिष्णूता, पोकळ घोषणाबाजी आणि वास्तव जाणून न घेता निर्णय व फतवे देण्याच्या प्रवृत्तीमुळे मी ट्विट करणे बंद केले होते.’ त्याचे म्हणणे आहे की, ‘मनावर लागलेले घाव भरणे म्हणजे हे घाव कधी लागलेच नव्हते, असा त्याचा अर्थ होत नाही.’ त्यावेळच्या जखमांचे आता आपल्यावर नियंत्रण राहिलेले नाही, असे म्हणता येईल. शाहरुख खान अप्रिय घटना विसरत नाही, हे स्पष्ट आहे. मात्र, हळूहळू त्याच्या प्रभावातून तो मुक्त होतो.