आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक आणि ऐश्वर्या पुन्हा सोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जाहिरात आणि नाट्यक्षेत्रात प्रल्हाद कक्कर अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आता ते अभिषेक आणि ऐश्वर्या रॉय बच्चनसोबत चित्रपट बनवणार आहेत. त्यात सोनू निगम संगीत देणार आहे. ऐश्वर्याचे पुनरागमन या चित्रपटातून होईल. गरोदर असताना ती मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोइन’मध्ये काम करत होती. गरोदर असण्याची गोष्ट लपवल्यामुळे मधुरसोबत तिचा वाद झाला होता. नंतर करीना कपूरने त्यावर घाव घालण्याचे काम केले. त्यातून ऐश्वर्या सावरली. ऐश्वर्या रॉयने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांत काम केले, तर मणिरत्नम यांच्या काही चित्रपटांत चांगला अभिनयदेखील केला. मणिरत्नमच्याच ‘गुरू’मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने श्रेष्ठ अभिनय केला होता. पहिल्या इनिंगमध्ये तिच्या फक्त दोन चित्रपटांना अपयश मिळाले होते. एक मणिरत्नमचा ‘रावण’ आणि दुसरा संजय लीला भन्साळी यांचा ‘गुजारिश’. या अयशस्वी चित्रपटातदेखील ऐश्वर्याने श्रेष्ठ अभिनय केला होता.

लग्नाआधी आणि लग्नानंतरदेखील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी एकत्र काम केले. ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनी लग्नाआधी अनेक चित्रपटांत काम केले होते. दुसर्‍या इनिंगमध्येदेखील त्यांनी ‘दो दुनी चार’ केला आणि आता ‘बेशरम’मध्ये दिसणार आहेत. यश चोप्राच्या शेवटच्या चित्रपटात दोघांनी एक दृश्य केले होते.

अमिताभ बच्चन आणि जयाने लग्नाआधी ‘जंजीर’ आणि लग्नानंतर ‘मिली’, ‘अभिमान’, ‘सिलसिला’मध्ये काम केले. दिलीप कुमार, सायरा बानो, किशोर कुमार, मधुबाला तसेच देव आनंद, कल्पना कार्तिक यांनीदेखील लग्नानंतर अनेक चित्रपटांत काम केले. अजय देवगण आणि काजोलने लग्नाआधी एक चित्रपट आणि लग्नानंतर एक चित्रपट केला.

दशकापूर्वी दिग्दर्शक मेहबूब खानची पत्नी नायिका होती. यांना घेऊन एक प्रसिद्ध औद्योगिक घराणे चित्रपट बनवत होते. मेहबूब खान आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झाल्यामुळे शूटिंगचा एक भाग रद्द करण्यात आला. त्यामुळे या घराण्याने चित्रपट बनवणे सोडले. ज्या उद्योगात पती-पत्नीच्या घरच्या भांडणामुळे निर्मात्याला नुकसान भरावे लागते अशा उद्योगात पैसा लावून फायदा नाही. पती-पत्नीला एकत्र घेऊन फायदेदेखील आहेत आणि नुकसानदेखील आहे. कारण मेकअपच्या सामानाबरोबरच घरगुती भांडणदेखील कामाच्या जागी येतात. प्रेक्षकांनादेखील विवाहित लोकांचे प्रेम पडद्यावर पाहणे आवडत नाही.

नायक आणि नायिका जेव्हा खर्‍या आयुष्यातदेखील प्रेम करतात, तेव्हा पडद्यावर सादर केलेल्या प्रेमाच्या दृश्यात भावनेची तीव्रता असते. ज्याप्रमाणे राज कपूर आणि नर्गिस यांच्या चित्रपटात दिसून आले. अलीकडेच प्रदर्शित ‘ये जवानी है दिवानी’मध्ये माजी प्रेमी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रेम दृश्यात तीच भावना होती. दिग्दर्शक अशा प्रकारच्या जोड्या आवर्जुन घेत असतात. कारण एकाच्या तारखा घेतल्यावर दुसर्‍याच्या तारखा सहज मिळतात. आउटडोअरमध्ये हॉटेलच्या दोन खोल्यांचा खर्चदेखील लागत नाही. मात्र त्यांच्यात भांडण झाले तर मग अडचण होते.

एकेकाळी गुरुदत्त आणि गीता दत्तमध्ये भांडण झाले होते. गुरुदत्त यांनी गीता दत्तला घेऊन ‘गौरी’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले होते. या चित्रपटामुळे त्यांचे परस्परातील संबंध सुधारतील अशी त्यांना आशा होती. मात्र सेटवर गुणवत्तेसाठी आग्रही असणारे गुरुदत्त गीता दत्तसोबत कडक वागले. परिणामी भांडण जास्त वाढले आणि चित्रपट रद्द करावा लागला. खरं तर वैवाहिक जीवनाची निश्चित पटकथा राहत नाही. तथापि, चित्रपटाची पटकथा असते. ‘मुगल-ए-आजम’च्या निर्मितीवेळी दिलीप कुमार आणि मधुबालाचे प्रेमप्रकरण संपले होते. मात्र या दोन्ही व्यावसायिक आणि शिस्तप्रिय कलावंतांनी उत्तम प्रेम दृश्य सादर केले. असो, या चित्रपटात सोनू निगमचे संगीत देणे चांगली गोष्ट आहे.